कारेगाव फाटा परिसरात अवैध देशी दारूचा महापूर ; बेलगुजरी येथे तिन ठिकाणी पत्त्याचा जुगार अड्यावर हजारोंची उलाढाल ।

[ कारेगाव फाटा प्रतिनिधी – बाबुराव भुत्ते ] 
धर्माबाद पोलीस स्टेशन अंतर्गत कारेगाव बिटमध्ये अनेक दिवसापासून अवैध धंदे तेजीत असुन अवैध देशी दारू सह जूगाराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पोलीस प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे.
कारेगाव फाटा बिट मधील बेलगुजरी, आटाळा 2,3, पिंपळगाव, कारेगाव, सालेगाव. चोंडी, चोळाखा, चिकना आदी गावात अवैध देशी दारू विक्री होत आहे.
 करखेली जारीकोट, कारेगाव फाटा येथील परवाना धारक देशी दारू दुकानातुन कनिष्ठ दर्जाच्या देशी दारूचे पार्सल पुरवठा केले जाते. गावात सहज दारू मिळत असल्यामुळे लहान बालकांमध्ये, तरूणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. तरूण मुलं दारू पिऊन पत्नीचा छळ करीत असल्याचे महिलां वर्गातून ऐकायला मिळत आहे. घरातील महिला शेताला गेल्याची संधी साधून घरातील माल विकुन रात्रीला जुगार अड्यावर हजारोची उलाढाल सुरु आहे. याचा नाहक त्रास महिलांना होत आहे.
धर्माबाद पोलीसांनी जणू अवैध देशी दारू वाल्यांना परवानगीच दिली काय? अशी चर्चा अनेक गावातील सुज्ञ नागरीक करीत आहेत. होणारी अवैध देशीची विक्री व जुगार बंद करावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.
www.massmaharashtra.com

युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून।

ताज्या बातम्या