कुंडलवाडी येथे देशी दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले ; ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त !

• कुंडलवाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

( कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे )
     शहरातील चुंगी नाका येथे दि.२१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास देशी दारू भिंगरी संत्रा ची अवैध वाहतूक करणारी कार कुंडलवाडी पोलिसांनी पकडली असून या कारवाईत ४ लाख ८० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी दिली आहे.
          कुंडलवाडी शहर व परिसरात अवैध देशी दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्या अनुषंगाने दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चुंगी नाका कुंडलवाडी येथे पेट्रोलिंग करत असताना बिलोली कडून धर्माबाद कडे जाणाऱ्या कार क्रमांक टिएस ३६ बी २९५९ या वाहनाची तपासणी केली असता यात देशी दारू भिंगरी संत्राचे नऊ बॉक्स ज्याची किंमत ३० हजार २४० रुपये व अवैध वाहतूक करणारी कार ज्याची किंमत ४ लाख ५० हजार असा एकूण ४ लाख ८० हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला,फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल रघुविर चव्हाण त्यांच्या तक्रारीवरून एका आरोपीविरुद्ध कलम 65,(अ),83,353 भादवी नुसार दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले.
सदरील कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित कासले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे,पोलीस कॉन्स्टेबल महेश माकुरवार, सुदर्शन कमलाकर,रघुविर चव्हाण,नागेंद्र कांबळे यांनी केली आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे हे करीत आहेत.या कार्यवाहीमुळे शहरातील अवैद्य धंदेवाल्याचे धाबे दणाणले असून पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या