आटाळा येथील गोदावरी नदी पात्रातून दिवस रात्र अवैध वाळू उपसाअवैध वाळू उपशाकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष !

[ कारेगाव फाटा वार्ताहर – आनंदराव सूर्यवंशी ]
 कारेगाव फाटा पासून जवळच आसलेल्या आटाळा येथील गोदावरी नदी पात्रातून रात्रन दिवस वाळूचा उपसा हेात आसून धर्माबाद महसूल विभागाचे जानूण बूजून दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. याबाबत अनेक तक्रारी होत असताना महसूल व पोलीस खाते कारवाई करण्यास जानूण बूजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या वाळू उपशात गावातील काही वाळू तस्कर व प्रमुख सहभागी असल्याचे कारवाई होत नसल्याची चर्चा होत आहे.

गोदावरी नदीचे पात्र दोन्ही थड्या भरुण असले तरी गोदावरी नदी पात्रात तराफे, सोडूण तराफ्याच्या व बीहारी बाबूच्या सहायाने दिवस रात्र वाळूचा उपसा चालू आहे. आटाळा येथील वाळू माफिया यांची दररोज रात्री व सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत बिहारी बाबूच्या सहायाने शेकडो ब्रास वाळू गोदावरी नदी पात्रातून उपसा करताना दिसून येत आहे.
रात्रीला चोरीने उपसा केलेली वाळू कोरगाव फाटा परिसरातील गावो गावी विक्री करून माफिया मोकळे होत आहेत. याकडे धर्माबाद तहसीलदार, मंडळअधिकारी , तलाठी यांचे पाठबस असल्याची चर्चा होत आहे. या परिसरात वाळू, विटासाठी माती मसम तस्कराना आच्छे दिन आले आहेत असे बोलले जात आहे.
येथे विटा तयार करण्यासाठी विना रॉयल्टी नदी काठाची माती उत्खनन करूण विक्री केल्या जाते. या परीसरात गौण खनिज व्यवसायाकाची चलती दिसून येत आहे . आटाळा येथे रात्रीच्या वेळी गोदावरी नदीपात्रातू काढलेली वाळू रात्रीच सभोवतालच्या खेडो पाडी विक्री करताना दीसून देत आहे. 
बाभळी बंधार कोंडल्यामुळे गोदावरी नदीचे पात्र दुथडी भरून पाणी असले तरी वाळू माफिया शकल लढवून तराफे व बिहारी बाबू च्या साह्याने वाळू उपसा करीत आहे संबंधित तहसीलदार व मंडळाधिकारी तलाठी व पोलीस यांचा वाळू माफियांना वर्धहस्त असल्यामुळे हा खेळ चालू आहे तसेच नदीकाठी शेकडो वीट भट्टया थाटल्यामुळे माती उत्खनन चालू आहे व तसेच शोरूम गुणविना परवाना उत्खनन चालू आहे वीट भट्यामुळे लागणारे लाकूडतोड जोमात चालू आहे झाडे तोडल्यामुळे पर्यावरण बिघडत चालले आहे प्रशासनाने यांची गंभीर दखल घेणे गरजे आहे.याकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासन वाळू तस्करांना आळा घालावा अशी जनतेतून मागणी होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या