वाघलवाडा व करखेली परिसरात अवैध वृक्षतोड जोमात!

● जंगल नामषेश होण्याच्या मार्गावर
● वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष!

(नांदेड जिल्हा प्रतिनिधी -आनंद सुर्यवंशी)

कारेगाव फाटा

सविस्तर वृत्त असे की, वाघलवाडा कारखाना व करखेली परिसरात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू असुन स्थानिक लाकुड व्यापारी परराज्यात आणि जवळच्या विटभट्टी व्यवसायासाठी लाकुड विक्री करीत आहेत.याकडे वनविभाग भोकर चे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरीक करीत आहेत.

या वृक्षतोडीमुळे जंगल नामषेश होण्याच्या मार्गावर असुन ही झाडांची बेसुमार कत्तल थांबवावी अशी मागणी वनप्रेमी जनतेतून होत आहे.

वाघलवाडा, सालेगाव, पिंपळगाव, बोळसा(बु) , रावधानोरा,कारेगाव, हारेगाव,पिंपळगाव, आटाळा, करखेली, गोळेगाव, निमटेक, हातनी, बिजेगाव, कौडगाव, हस्सा, कावळगुडा, सिंगणापुर,करकाळा, बोरजुन्नी,नागठाणा,चिंचाळा, तळेगाव आदि गावात स्थानिक लाकुड व्यापा-यांकडून अवैध वृक्षतोड चालू असुन गोदावरी नदीकाठच्या विटभट्टी व्यवसायासाठी ही लाकुड विक्री करीत आहेत.

तर काही मोठ्या नगाचे लाकुड परराज्यात जसे की, तेलंगाणा-आंध्रप्रदेश येथे पार्सल करीत आहेत.

लिंब, आंबा, बाभुळ, चिंच, जांभुळ, साग, चिमणसाग, बोरी, सुबाभुळ, आदि मौल्यवान वृक्ष तोडण्यास भोकर वनविभागाचे लाकुड तस्करांना सहकार्य होत आहे.

औषधी वनस्पतीचे संरक्षण व्हावे, वृक्षांचे संवर्धन व्हावे, पर्यावरण चांगले रहावे यासाठी शासन “झाडे लावा झाडे जगवा” मोहिमेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च असले तरी वनविभागाच्या संबंधीत अधिकारी, शेरेदार, चौकीदार, यांनी लाकुड व्यापारी, फर्नीचर दुकानदारांशी संगणमत करून आपल चांगभलं करून घेण्यात धन्यता मानत आहेत.

यामुळे “कुंपणाच शेत खातंय ” असं म्हणण्याची वेळ वनप्रेमी नागरिकांवर आली आहे.

ताज्या बातम्या