वाघलवाडा कारखाना साईड व परिसरातील गावांच्या शिवारात (जंगलात) अवैध – वृक्षतोड मोठया प्रमाणात चालू असून स्थानिक लाकुड व्यापारी परराज्यात व जवळच्या विटभट्टीवाल्याना लाकुड विक्री करीत आहेत. वनविभाग भोकर जानिपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने येथिल जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अवैध वृक्ष तोड थांबवावी अशी मागणी वनप्रेमी करीत आहे.
वाघलवाडा, सालेगाव, पिंपळ्गाव बोळसा (बु) रावधानोरा, कारेगाव, हरेगाव, पिंपळगाव, हातनी, बिजेगाव, कौडगाव, आटाळा, हस्सा, कावळगुडा, सिंगणापुर, नागठाणा, करकाळा, बोरजून्नी, चिंचाळा, तळेगाव, गोळेगाव, निमटेक, तळेगाव आदी – गावात स्थानिक लाकुड व्यापाऱ्याकडून अवैध व वृक्ष तोड चालू असून गोदावरी नदी काठावरील विटभट्टयांना हे लाकुड पूरवित आहेत.
तर काही मोठे नगाचे लाकुड परराज्यात ( तेलंगणा – आंध्रप्रदेश ) मोठ्या व्यापाऱ्याला पार्सल करीत करित आहेत. तसेच लिंब, आंबा, बाभुळ, चिंच, जांभूळ, साग, चिमनसाग, बोरी, सुबाभूळ, आदी मौल्यवान वृक्ष तोडण्यास भोकर वनविभागाचे लाकुड तस्करांना सहकार्य होत आहे.
औषधी वनस्पतीचे संरक्षण व्हावे अन् वृक्षाचे संवर्धन व्हावे पर्यावरण चांगले राहावे म्हणून शासनाने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ कार्यक्रम हाती घेऊन कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. मात्र वनविभागाच्या संबधित अधिकारी, शेरेदार, चौकीदार यांनी लाकुड व्यापारी, फर्निचर दुकानदार संगनमत करून आपले चांगभलं करुन घेण्यात धन्यता मानत आहेत. यामुळे – कुंपनच शेत खाते म्हणण्याची वेळ वनप्रेमी नागरीकांवर आली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy