सोहम पोतनकर याला आयएमओ परीक्षेत सुवर्णपदक

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी येथील के.रामलू पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सहाव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी सोहम भीम पोतनकर याने २०२३- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलंपियाड या गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत शाळेतून प्रथम रॅन्क मिळवून सुवर्णपदक पटकावला आहे.
तो आता दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरलेला आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सायरेड्डी ठकुरवार, सचिव यशवंत संगमवार ,संचालिका सौ. रमा ठकूरवार, प्राचार्य टी.नरसिंगराव, मुख्याध्यापक पापय्या मठवाले, गणित विषयाचे शिक्षक दत्तराम लाड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या