सुरुवातीला एकूण नऊ स्तुपाची निर्मिती करण्यात आली होती त्या पैकी आठ स्तूप हे बुद्धाच्या शरीर धातू वर आणि नववा स्तूप ज्या पात्राने अस्थी चे वाटप केले होते त्या पात्रावर निर्माण करण्यात आला.ते अश्या प्रकारे
म्हणजे स्तूप ची संकल्पना बुद्धा च्या अस्थी चे जतन करणे व संवर्धन करणे होय. सम्राट अशोक राजाला सात स्तुपातील अस्थी मिळविन्यात यश आले,परंतु 8 व्या स्तुपातील अस्थी मिळवू शकले नाही तो म्हणजे रामाग्राम स्तूप.रामा ग्राम च्या नाग लोकांनी सम्राट अशोक यांना अस्थी देण्यास नकार दिला होता इतकेच नाही तर जर जबरदस्ती करत असाल तर आम्ही युद्ध करू,परंतु सम्राट अशोक यांनी कलिंग च्या युद्धा नंतर परत कधीही युद्ध करणार नाही असा निच्चय केला होता, म्हणून अस्थी नाही मिळाल्या तरी चालेल पण युद्ध नको अशी सम्राट अशोक राजांनी भूमिका घेतली, व उर्वरित 7 स्तूपा मधील अस्थी वर सम्राट अशोक राजाने 84000 स्तुपाची निर्मिती केली.
●● स्तुपाचे प्रकार :स्तुपाचे एकूण चार प्रकार आहेत.
1. #शारीरिक_स्तूप : बुद्धाच्या अस्थी धातू वर निर्माण करण्यात आलेल्या स्तुपाला शारीरिक स्तूप म्हणतात. 2. #परिभोगीका_स्तूप : ऑब्जेक्ट स्तूप,बुद्धाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापरलेल्या वस्तू व त्यावर निर्माण करण्यात आलेल्या स्तुपाला परिभोगिका स्तुप किंवा object स्तुप म्हणतात. 3. #कॉममोमोरॅटिव्ह_स्तुप, सिम्बॉलीक स्तु प किंवा उद्देशिका स्तु प :बुध्दा च्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या व जिथे जिथे घडल्या. बुध्दा नि ज्या ज्या ठिकाणी प्रवचन दिले किंवा धम्म उपदेश दिले त्या ठिकाणावर जे स्तुप निर्माण केले त्याला सिम्बॉलीक स्तुप किंवा उद्देशीका स्तूप असे म्हणतात. 4.#वोटिव्ह_स्तूप : आपल्या दैनंदिन जीवनात जेंव्हा आपण वरील स्तूपात जाऊ शकत नाही त्या करिता पूजेचे स्थान निर्माण केले जाते व त्यावर स्तूप निर्माण केल्या जाते त्याला वोटिव्ह स्तूप किंवा मन्नत स्तुप असे म्हणतात. असे स्तूप बहुदा केणी मध्ये निर्माण केले जाते
सिम्बॉलीक स्तुप किंवा उद्देशीका स्तूप असे म्हणतात
स्तुपाची ची विभागणी : स्तूप एकूण आठ गटा मध्ये विभागले आहे
1. #जोथा : जोथा म्हणजे स्तुपा चा पाया किंवा खालचा भाग याला कधी कधी तीन रिंग असतात. 2. #मेधी : हा जोथा च्या वरचा भाग uव उंच असतो. 3. #वेदिका : मेधी च्या वरचा भाग त्याला वेदिका असे म्हणतात. 4. #वेदिका_पट्टी :वेदिकेच्या वरचा भाग याला रेलिंग असतात हा भाग चक्रमण करण्या करिता उपयोगात येतो. 5. #अंड : वेदिकाच्या वरचा भाग,हा गोलाकार असतो त्याला अंड असे म्हणतात. 6. #हार्मिका : हा अंड च्या वरच्या भागावर हर्मिका असतात त्या कधी तीन तर कधी पाच असतात. 7. #यशठी : हा हर्मिकेचा वरचा भाग की जो छत्रावली ला सपोर्ट करतो. 8. #छत्रावली : हा स्तुपाचा सर्वात उंच व शेवटचा भाग होय..
अश्या प्रकारचा परिपूर्ण स्तूप आपणाला कार्ले बुद्ध लेणी वर बघायला मिळतो.
सध्य परिस्थितीत उपलब्ध असलेले भारतातील स्तूप :
1. #सांची स्तूप : सांची स्तूप हा मध्य प्रदेश मध्ये असून भोपाल पासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. त्याचे उतखणन केले असता तिथे बुध्दाचे शिष्य सारीपुत्त आणि महा मोग्गलांन यांच्या अस्थी मिळाल्या आहेत.1989 ला या स्तूपाला वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा मिळाला आहे. यांचा शोध जेंव्हा मध्य प्रदेश मधून भीमा कोरेगाव च्या युद्धाला मदत करण्या करिता एक बटालियन निघाली होती परंतु यूद्धाचा शेवट दुसऱ्या च दिवशी झाल्या मुळे ते परत जात असता एका ठिकाणी थांबले व दुसरे दिवसी एका टेकडी वर शिकारीला गेले असता तिथे त्याना काही मानव निर्मित भाग दिसून आला त्याचे उतखंनं न केला असता सांची स्तुपाचा शोध लागला. 2. #द_ग्रेट_स्तूपा_ऑफ_अमरावती : हा स्तूप इ. स पूर्वी तिसरे शकतात सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. यांचा बराच भाग नष्ट झाला आहे त्याचे काही शिल्प आणि आर्ट मद्रास musium मध्ये सुरक्षित ठेवले आहे.1797 मध्ये ब्रिटिश आर्चलोजीस्ट मेजर कोलिन mackenze यांनी त्याचा शोध लावला व त्याचा प्लॅन तयार केला. 3. #धामेक_स्तूप : हा स्तूप सारनाथ येथे असून सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे व मेजर जनरल सर Alekshander Cunningham यांनी स्वतःचे पैसे खर्च करून1837 मध्ये उतखंनं केले व त्याचा शोध लावला, याच ठिकाणी बुद्धाने आपल्या पाच पंच वर्गीय भिककूना प्रथम उपदेश दिला. 4. #चौखंडी_स्तूप : हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे,हा स्तूप चौरस असून त्याला आठ बाजू आहेत याच ठिकाणी जे पाच मित्र होते ते बुध्दाला सोडून गेले होते, आठ बाजू म्हणजे आर्य astangik मार्ग चे प्रतीक आहे. हा स्तूप सारनाथ जवळ आहे.
5.#बहरुत_स्तूप : बहरुत स्तूप हा सटना मध्य प्रदेश येथे आहे, हा स्तूप ई. स पूर्वी तिसऱ्या शतकात सम्राट अशोक राजाने निर्माण केला,हा स्तूप सम्राट अशोक ने प्रथम निर्माण केला.हा स्तूप बराच नष्ट झाला असून त्याचे काही भाग कलकत्ता musium येथे सुरक्षित ठेवले आहे, या स्तूपा चे संवर्धन सम्राट shung ने इ स पूर्वी दुसऱ्या शतकात केले,आता तिथे फक्त काही अवशेष शिल्लक आहे.यांचा शोध सर Alexander Cunningham ने 1873 मध्ये लावला.येथे काम करणे करिता व शिल्प कलकत्ता musium ला ने आ न करण्या करिता ब्रिटिश सरकारने रेल्वे लाईन टाकली होती.
6. #केसारिया_बुध्द_स्तूप : केसारिया स्तूप हा बिहार मध्ये आहे, याच ठिकाणी बुध्दा चे महा परी निर्वाण झाले हा स्तूप सम्राट अशोक राजाने ई. स पूर्वी तिसऱ्या शतकात निर्माण केला.colonel Mackenzie यांनी 1814 मध्ये यांचा शोध लावला परंतु सर Alexander Cunningham यांनी 1861 -62 मध्ये उतखंनं न करून याच ठिकाणी बुध्दा चे महापरी निर्वाण झाले ते सिद्ध केले.
7. #देऊर_कोठार_बुद्ध_स्तूप_किंवा_सोनारी_स्तूप :हा स्तूप मध्य प्रदेश मध्ये आहे,हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे यांचं ठिकाणी सम्राट अशोक यांनी 84000 बुद्ध अस्थी धातू ची वाटणी केलीहोती,
8 #महाबोधी_महाविहार_किंवा_महाबोधी_स्तूप : महाबोधी महाविहार यांच ठिकाणी बुध्दाला ध्यान प्राप्ती झाली,सम्राट अशोक राजाने प्रत्यक्ष साईट वर हजर राहून या महाविहाराची निर्मिती केली, याच ठिकाणी संयाम देशाचे तपससू आणि भल्लिक यांना बुद्धाने केस धातू दान दिले.सर Alexander Cunningham यांनी 1888 भेट दिली व बुध्दा चे वजरासन शोधून काढले.
9. #भावीकोंडा_बुध्द_स्तूप_किंवा_महास्तूपा : हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला, या स्तुपाचे जेंव्हा उतखंनंन करण्यात आले तेंव्हा बोन्स, पॉट, मंजुषा, जेम्स, व कॉइन्स मिळाले.हा स्तूप आंध्र प्रदेश मध्ये आहे
10. देवणी मोरी स्तूप : हा स्तूप गुजरात मध्ये आहे या ठिकाणी बुद्धाच्या अस्थी मिळाल्या व त्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्या पीठ येथे सुरक्षित ठेवल्या आहेत.
11. #पवणी_स्तूप : हा स्तूप भंडारा जिल्ह्यात आहे, विदर्भात बौद्ध धम्माचे एक महत्वाचे ठिकाण होते , तसेच याला व्यापारीक महत्व होते, तसेच ते दक्षिण भारत व उत्तर भारत ला जोडण्याचे मध्यवर्ती ठिकाण होते येथे सातवाहन सम्राट सातकरणी यांचे नाणे येथे उतखंनंन केले असता मिळाले, येथील काही शिल्प नॅशनल musium दिल्ली व मुंबई येथे सुरक्षित ठेवले आहे. अजून बरेच शिल्प इतस्थ ता विखूरले आहे, स्तुपावर अतिक्रमण करून जगन्नाथ मंदिर निर्माण केले.
स्तूपाची निर्मित ई स पूर्वी 3सरे शतकात झाली त्याचा डायमीटर 38.10 मिटर आहे. विदर्भातील नाग राजा मुच्चलिंद याला जेंव्हा बुध्दाचे महापरिनिर्वाण झाल्याची बातमी समजली तेंव्हा तो कुशीणारा ला बुध्दाच्या अस्थी मिळविण्या करिता निघाला,जेंव्हा तिथे पोहोचला त्यावेळी बुध्दाच्या अस्थी चे विभाजन झाले होते,ज्या ठिकाणी बुध्दाला अग्नी देण्यात आला त्या ठिकाणावर तो गेला व त्याने हाताने सर्व माती गोळा केली त्या मध्ये त्याला दंत धातू अस्थी मिळाल्या व त्या दंत धातू अस्थी वर हा पवणी स्तूप निर्माण केला.
12. #सुलेमान_टेकडी_स्तूप : हा स्तुप पवणी स्तु पा पेक्षा मोठा आहे त्यांचा डायमीटर 41.6 मिटर आहे, व हा पवनी येथे आहे. यालाच चांड कापूर स्तूप असे सुद्धा म्हणतात
13. #हरदोलाल_टेकडी_स्तूप : हा स्तूप पवणी येथे आहे, यांचे उतखंनंन केले असता एक मोठी दगडी शिल्प मिळाले ते नागपूर च्या musium मध्ये सुरक्षित आहे. तसेच पवनीला एक किल्ला सुद्धा आहे.
14. #सोप्पारका_स्तूप: हा स्तूप नाला सोपारा यथे आहे,एप्रिल 1882 ळा पंडित भगवाण दास ईद्राजी या स्तुपाचे उतखनन केले असता स्टोन कास्केट, गोल्ड कास्केट, शिल्प तसेच आठ बुद्धाच्या भिक्षा पात्राचे तुकडे मिळाले व काही सोन्याचे फुले मिळाले ते एसीयाटीक सोसायटी ऑफ इंडिया मुंबई येथे सुरक्षित आहेत.तर सम्राट अशोक चा 9 वा शिलालेख musium मध्ये सुरक्षित,सोपारा एक बौद्ध धम्माचे व तसेच व्यापारी केंद्र होते, येथूनच सम्राट अशोक राजाने मुलगी sanghmitra हिला बोध गया येथील बोधी वृक्षा ची फांदी सुवर्ण पात्रात स्वतःच्या हाताने देऊन सिलोन ला धम्म प्रचा करिता रवाना केले.
15. #घारापुरी_बुध्द_स्तूप :दिनांक 20 फेब्रुवारी,2022 या दिवशी महाराष्ट्रातील विविध ठिकानावून आलेले जवळ पास 150 लोकांनी घरापुरी मौर्या कालीन प्राचीन स्तुपा भेट दिली व स्तुपाचे महत्व हे जाणून घेतले. प्रशांत माळी यांनी लेणी संवर्धन कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले, मुकेश जाधव यांनी आलेल्या लोकांचे आभार व्यक्त केले तर रवींद्र सावन्त यांनी घरापुरी स्तूपा बद्दल विस्तृत माहिती दिली,राहुल जाधव यांनी सम्राट अशोक यांचे काढलेले सुंदर sketch ABCPR ला भेट दिले तर पुणे येथून आलेले अनिल ननावरे यांनी बुद्ध स्तुपाची प्रतिकृती प्रशांत माळी यांना भेट दिली तसेच आम्ही भारतीय च्या संघ मित्रा बा रसाकडे यांनी चित्रीकरण केले.elephanta cave हे world हेरिटेज आहे, परंतु याच ठिकाणी दोन तीन किलोमीटर च्या अंतरावर मौर्य कालीन स्तूप आहे, जेंव्हा पोर्तुगिज लोक महाराष्ट्रात आले तेंव्हा ते लोक लेणी वर सराव करायचे. परंतु जेंव्हा ब्रिटिश लोक आले त्यांनी मात्र भारतातील प्राचीन बौद्ध धरोधर यांचा शोध लावला, या स्तुपाचे त्यांनी उतखंनं न केले नाही, परंतु undisclosed बुद्धिस्ट मोनूमेंट म्हणून नोंद केली. हे ठिकाण अरबी समुद्र च्या किनाऱ्यावर आहे येथून J N P T बंदर जवळ आहे यांचे उतखनन होने बाकी आहे.
16. #पुषागिरी _बुध्द_स्तूप : हे बुद्धिस्ट Monastry आहे, ओडिसा मध्ये पुरी जिल्ह्यात आहे बौद्ध धम्माचे एक महत्वाचे केंद्र होते त्याच प्रमाणे ललितगिरी, रत्नागिरी, व उदयगिरी येथे मोठ्या प्रमाणात monastry होत्या ते सम्राट अशोक राजाने निर्माण केले होते.
चायनीस प्रवासी Xuanzang यांनी सहाव्या शतकात भेट दिली असता इथे मोठ्या प्रमाणात संघाराम होते अशी नोंद केली होती.
1990 ला उदयगिरी च्या जवळ लं गु डी हिल येथे उतखंनं न केले असता (पुष्प सभर गिरिया ) अश्या प्रकारचा शिला लेख मिळाला होता म्हणून याला पुष्पगिरी हे नाव दिले हे एक प्राचीन विद्या पीठ होते.
17. #कोल्हापूर_स्तूप.: इथे प्राचीन मौय कालीन प्राचीन स्तुप होता ई स पूर्वी तिसरे शतकात बौद्ध धम्माचे एक महत्व पूर्ण ठिकाण होते, इथे 135 वर्षा पूर्वी उतखंनं न केले असता बुध्दाच्या अस्थी मिळाल्या होत्या, त्या कुठे आहे यांचा शोध लागत नाही. तसेच मिरज हे सुद्धा बौद्ध धम्माचे प्राचीन केंद्र होते.
18. #भोंन_स्तूप: हा मौर्या कालीन स्तूप असून बुलढाणा जिल्यात शेगाव जवळ आहे ई स पूर्वी तिसरे शतकात हे ठिकाण बौद्ध धम्माचे एक महत्व पूर्ण ठिकाण होते. येथे उतखंनं न केले असता सातवाहन कालीन 5 नाणे मिळाले सध्या इथे स्तूपा वर शेती करतात तर काही भागा वर भोन गाव ची वस्ती आहे
19. #अंगुलीमाल_स्तूप : हा स्तूप श्रावस्थी मध्य प्रदेश मध्ये आहे .या स्तूपा चे उतखंनं न 1863 मध्ये करण्यात आले, याच ठिकाणी अंगुली माल आणि बुध्द यांची भेट झाली व अंगुली माल यांना भिक्कू संघात समाविष्ट करण्यात आ ले.
20. #अनाथ_पिंडक_स्तुप_श्रावस्थी : हा स्तूप अनाथ पिंडक यांनी निर्माण केला हा कॉममो मोरेटिव्ह स्तुप आहे, अनाथ पिंडक ने बुध्दाला व भिक्कू संघाला जेवणाचे निमंत्रण दिले होते ते याच ठिकाणी.
21. #महास्तूप : नेला कोंडा पल्ली :हा स्तूप खम्मान जिल्हा, तेलंगणा येथे आहे, हे एक प्राचीन बुद्धिसम चे महत्वाचे ठिकाण होते, तसेच हे एक मंडल चे मुख्यालय होते येथे प्राचीन मानव निर्मित लेक आहे, तसेच इथे उतखंनं न केले असता 100 प्राचीन नाणे मिळाले, तसेच 1976 ते 1985 उतखन न केले असता हा स्तूप 54 फीट उंच आहे,84 फीट inner daimeter व outer 138 फीट आहे, इथे सुद्धा नाणे, earthan ware मिळाले,व ते विजयवाडा musium येथे सुरक्षित आहे,सम्राट सातवाहन यांनी या स्तु पाला अति भव्य बनविले.
22. #सिलिगुरी_बुद्ध_स्तूप : वेस्ट बंगाल, ही एक earliest monestry आहे, दलाई लामा ने निर्माण केली आहे यांची उंची 100 फीट आहे.
23.#अनेगुट्टी_बुद्ध_स्तूप :हा स्तूप संनती स्तूप च्या उत्तरेला 2 किलोमीटर अंतरावर आहे, इथे मोठ्या प्रमाणात हत्ती चे शिल्प दान दिल्याची नोंद आहे व सन्नती स्तूपा च्या प्रोटेकशन करिता निर्माण केला आहे, हा स्तूप सम्राट सातवाहन यांनी निर्माण केला आहे.
24. #सन्नती( महा )स्तूप : कनगनाहल्ली स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे हा स्तूप गुलबर्गा, कर्नाटक येथे आहे. सम्राट अशोक यांनी पदभार स्विकारल्या नंतर 14 वर्षी भेट दिली. व दुसरी भेट राज्या भिषेक झाल्या नंतर 20 व्या वर्षी दिली व भव्य स्तूप बांधण्याच्या विषयी सूचना केली. व त्या नंतर सम्राट सातवाहन यांनी तिथे शिल्प कला व विकसित केली.
25. #अद्दूरू_बुद्धिस्ट_स्तूप : अद्दूरू बुद्धिस्ट स्तूप हा आंध्र प्रदेश येथे आहे. वानेतीया नदीच्या किनाऱ्यावर असून सम्राट अशोक यांची मुलगी संघ मित्रा श्रीलकेला जात असते वेळी याच ठिकाणी थांबली होती. येथे 1953 ला उtखंअनन केले असता धम्म चक्र मिळाले त्याचा डाय मिटर 17 फीट चा होता.
26. #अमरावती_स्तूप : महाचैत्य स्तूप हा आंध्र प्रदेश मधील सर्वात मोठा स्तूप आहे, डाय मिटर 50 मीटर व उंची 27 मीटर आहे यातील काही भाग मद्रास musium आणि ब्रिटिश musium मध्ये ठेवले आहेत, याच ठिकाणी सम्राट अशोक यांनी भिक्कू महादेवा यांची नियुक्ती मनीषा मनडला म्हणून केली व त्याच्या वर हिमालयात धम्म प्रचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
27. #कुरुषेत्र_बुद्ध_स्तुप : कुरुक्षेत्र किंवा हरियाणा हे बुद्ध धम्माचे प्राचीन केंद्र होते, सम्राट हर्ष वर्धन यांच्या शासन काल मध्ये चिनी प्रवाशी हुएन सांग यांनी आपल्या प्रवास वर्णन मध्ये या ठिकाणी बुद्ध स्तुप असल्याचे वर्णन केले आहे. हे स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केले होते,हा स्तूप कुरुक्षेत्र विद्यापीठ च्या परिसरात आहे, हा स्तूप लुप्त झाला होता परंतु स्थानिक बुद्ध अनुयायांनी यांचा पाठ्पुरावा केल्या मुळे ASI ने संवर्धन चे काम सुरु केले तसेच दुसरा बुद्ध स्तूप यमुना नगर येथे आहे.
28. #गिरीयाक_बुद्ध_स्तूप : हा स्तूप नालंदा प्राचीन विद्यापीठा पासून 22ते 25 किलोमीटर अंत्तरावर आहे, हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे, हा स्तूप सिलेंड्रीकल असून त्यांची उंची 30 फिट आहे, व चैत्य गिरी पर्व ता व र आहे. इथे सुद्धा प्राचीन बुद्ध विद्या पीठ होते
#भारताच्या_बाहेरील_स्तूप:
29. #सुजाता_बुद्ध_स्तूप :हा स्तूप बोध गया च्या जवळ आहे, फाल्गु नदीच्या तिरावर हा स्तूप आहे, याच ठिकाणी सुजाता ने सिद्धार्थ गौतम यांना खीर दान दिली होती, हा स्तूप ई स पूर्वी दु सऱ्या शतकात सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे. A S I ने 1973-74 ला उतखंनं न केले असता देवापाल राज घराण्याचा शिला लेख मिळाला (देवापाला राजस्य सुजाता ग्रीह )हा स्तूप कॉममोमोरेटिव्ह स्तूप आहे सातव्या शतकात जेंव्हा चिनीस प्रवासी हुएन त्संग निरंजना नदी क्रॉस केल्या नंतर त्याने स्तूप, स्टोन कॉलम बघितले ची नोंद आहे, तसेच या ठिकाणाला गंध हस्ती असे म्हटले जात असे.
बुद्धाने खीर प्राशन केल्या त्याच्या शरीरात ऊर्जा निर्माण झाली, व बुद्धाने निकसर्ष
काढला की जिवंत राहण्या करिता मानवाला अन्नाची आवश्यकता आहे.
30.#कनिष्क_स्तुप:हा स्तूप सम्राट कनिष्क यांनी निर्माण केला, यालाच शाहजी की ढेरी असे म्हटले जाते, तसेच याला house ऑफ बुध्दा रिलीक्स असे म्हटले जाते, हे एक प्रचिन स्तुप असून जगातील सर्वात उंच स्तूप आहे. हा स्तूप ई स पूर्वी पहिले शतक ते ई. स नंतर पहिले शतक मध्ये निर्माण करण्यात आला, सुरुवातीला हा स्तूप लाकडी बनविण्यात आला व त्यावर precious स्टोन लावण्यात अले एकूण तेरा लेयर मध्ये निर्माण करण्यात अले सर्वात उंचीवर व कॉपर चे छत्र बसविण्यात आले. इथे 1908-1909 ला ब्रिटिश ASI ने डेव्हिड ब्रेनार्ड ने उतखंनं न केले असता बुध्दाच्या अस्थी धातू मिळाल्या व त्या बर्मा येथे सुरक्षित आहेत तर सम्राट कुशान च्या अस्थी पेशावर च्या musium मध्ये सुरक्षित ठेवल्या आहेत. कुशान पिरेड हा Gandhar शैली म्हणून प्रसिद्ध आहे.याच ठिकाणी चौथी धम्म सांगिती 78 AD ला कनिष्क च्या अध्यक्ष ते खाली झाली होती.व तेंव्हा पासून ई. वि. सणाची सुरुवात झाली, पूर्वीचे कनिष्कपूर व आताचे काश्मीर.
31. #शिंगारदार_स्तूप : तिसऱ्या शतकात निर्माण केले आहे, स्वातं घाटी मध्ये ब्रिटिश ASI कर्नल deane अँड S. A. Stain यांनी 1886-1930 मध्ये शोधून काढला. राजा उत्तरसेंन राजा जेंव्हा बुध्दा च्या अस्थी घेऊन जात असतानी त्याचा हत्ती इथे थांबला होता, हा स्तूप स्वातं राजाने निर्माण केला.
32.#एकसे_आठ_स्तुपा_ऑफ_चायना:ही 108 बुध्द स्तूप ची गॅलरी हिल साईड on the वेस्ट bank ऑफ Yellow रिव्हर at Ning xia, चीन येथे 1038 ते 1227 मध्ये वेस्टर्न Xia राजवन्स ने निर्माण केले आहे, पश्चिमात्य देशामध्ये 108 या नंबर ला खूप महत्व आहे, 108 स्तूपा च्या समोर दोन स्तूप होते ते 1958 नष्ट झाले,1987 ला reno vation केले असता बुद्धिस्ट सूत्र धम्म लिपी मध्ये लिहिलेले आढळून आले,तसेच माती चे स्तूप व त्या वरील झाकणे व त्यावर बुध्दाचे शिल्प व potery आढळून आले.हे स्तूप एकसारखे नसून लहांन मोठे आहे तसेच त्याची प्रतिकृती रथा सारखी आहे
33. #बोरोबर_स्तूप: हा स्तुप जावा बेटावर इंडो नेशिया येथे आहे, हा स्तूप 7 व्या शतकात निर्माण केला. हा जगातील सर्वात मोठा बुद्धिस्ट स्तूप आहे. या स्तुपाला एकूण 2672 पॅनल असून 504 बुध्द मूर्ती आहे. स्तु पाची रचना शष्ठकोनी असून वरचा भाग त्रिकोणी आहे.
मुख्य गोलाकार घुमट मध्ये एकूण 72 बुद्धाच्या मूर्ती आहेत.
1814 मध्ये सर थॉमस stamford raffles ने शोध लावला.1975 ते 1982 या पिरेड मध्ये इंडोनेशीयन सरकारने मोठ्या प्रमाणावर संवार्ध न केले व त्याला वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट केले.
34. #रुंमिन_देवी_स्तूप : हा स्तूप नेपाळ येथे आहे याच ठिकाणी बुध्दा चा जन्म झाला, सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे.राज्याभीशे क झाल्या नंतर आठ वर्षानि या ठिकाणाला भेट दिली, व त्या गावाचा कर माफ केला फक्त आठवा भाग देण्यात यावा अश्या प्रकारचा शिला लेख लिहिण्यात आला.
35. #शांती_स्तूप_लेह जम्मू_अँड_काश्मीर.
हा स्तूप 1983 ते 1991 या दरम्यान जपानी बौद्ध भिक्षु बुद्धाच्या 2500 व्या जयंती निमित्ताने व जगाला shanticha संदेश देण्या करिता डोंगर दऱ्या मध्ये निर्माण केला.
36. #द्रो_डूल chorten #स्तूप सिक्कीम : हा स्तूप trulshik रिणपोचे आणि Nyingma चे प्रमुख तिबेटन बुद्धिसम यांनी 1945 मध्ये निर्माण केला. इथे एकसाथ 700 भिक्कू किनवा उपाsak बसू शकतात.
37 #क्लेमेंट_टाउन_स्तुप डेहराडून :यांची उंची 185 फीट आणि रुंदी 100 फीट आहे इथे 103 फीट उंची बुध्द statue आहे, बुद्धिस्ट आर्ट, मुरेल्स and shrine रूम तिबेटीयन पद्धतीचे आहे.
38. #गोसाराम Chorten #स्तूप अरुणाचल प्रदेश :हे इम्पॉर्टन्ट बुद्धिस्ट सेंटर आहे twang पासून 90 किलोमीटर अंतरावर आहे हा स्तूप 12 व्या शतकात Monpa Monk यांनी निर्माण केला.
39.#कल्याण #स्तुप :कल्याण पूर्वेला बिग बाजार च्या समोर जी टेकडी आहे तिथे पूर्वी प्राचीन बुद्ध स्तूप होता आजही त्याचे अवशेष बघायला मिळतात. परंतु आज त्यावर मज्जीद आहे. कल्याण हे बुद्ध धम्माचे तसेच व्यापाराचे प्रसिद्ध केंद्र होते,सम्राट सातवाहन यांच्या राजवटीत ते अत्यंत प्रगती पथावर होते. व्यापार जलद व्हावा म्हणून 2500 फिट चा डोंगर फोडून नाणे घाट निर्माण केला.
कान्हेरी लेणी मध्ये एकूण 75 च्या वर शिलालेख आहेत त्याला पैकी 12 शिलालेख मध्ये कल्याण येथील राहिवासी यांनी धम्म दान दिल्याची नोंद आहे.
40. #सम्राट_अशोक_स्तंभ : हा स्तंभ मलबार हिल येथे आहे, तसेच इथे प्राचीन महाथेरो चा स्तूप होता आज त्याला म्हातारीचा बूट असे म्हणतात.ब्रिटिश सरकार चे पूर्वी हेड quarter परेल होते परंतु मुंबई ला महापूर आल्यामुळे त्यांनी हेड quarter मलाबार हिल ला शिफ्ट केले तेंव्हा पासून इथे सरकारी व खाजगी बांध काम निर्माण झाले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy