ज्या स्वातंत्र्यवीरानी देशाला बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळालं त्याची आठवण म्हणून ही पदयात्रा निघाली आहे – मा.आमदार वसंतराव चव्हाण

  • नायगाव तालुका काँग्रेसच्या वतीने निघालेल्या नरसी ते नायगाव काँग्रेस पक्षाचे आजादी गौरव पदयात्राचे जंगी स्वागत
[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आजादी गौरव पदयात्रेच्या संदर्भात माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतरावजी चव्हाण यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रभारी बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्यासह प्रमुख मान्यवर कार्यकर्त्यांच्य उपस्थितीत भव्य पदयात्रा रॅली निघाली.

भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले, नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण, यांच्या आदेशानुसार नायगाव तालुका काँग्रेसच्या वतीने नरसी भगवान बालाजी मंदिर हे दर्शन घेऊन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहून नुकतेच अपघातात निधन झालेल्या शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहून राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
राष्ट्रगीता नंतर काँग्रेस कमिटीच्या पदयात्रेला सुरुवात झाली या पदयात्रेत स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन डीजेच्या तालावर भव्य दिव्य हजारोच्या संख्येने पदयात्रा नायगाव येथे संपर्क कार्यालयापर्यंत येऊन नायगाव शहरातून शिवाजी चौक, हेडगेवार चौकापासून जयराज पॅलेस येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
 या बैठकीला प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील यांनी केले तर प्रमुख अतिथी काँग्रेस पक्षाचे प्रभारी बाळासाहेब रावनगाकर म्हणाले देशाला शूरवीरांनी बलिदान दिले म्हणून स्वातंत्र्य मिळाले त्याची आज आठवण म्हणून 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आजादी गौरव पदयात्राचे आयोजन करण्यात आले.
तसेच नायगाव तालुका हा कै बळवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने तालुक्याचा काय पालट झाला व सुधारला गेला म्हणून येणाऱ्या काळात माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनाच आमदार म्हणून बघायचे आहे.  म्हणून कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असे ते म्हणाले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव पा चव्हाण, काँग्रेस पक्षाचे प्रभारी बाळासाहेब रावणगावकर, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे,माधवराव बेळगे , केशवराव पा चव्हाण, मोहनराव पा धुपेकर माधवराव पा जाधव, हनमंतराव पाटील चव्हाण, सभापती संजय बेळगे,संजय पा शेळगावकर ,मनोहर पवार, मनोज पा टाकळीकर, श्रीनिवास पाटील चव्हाण, सय्यद रहीम शेठ , बालाजीराव मदेवाड, नगराध्यक्ष विजय पा चव्हाण, प्राचार्य रवींद्र पा चव्हाण , स इसाक सेठ नरसीकर, नारायण पा जाधव, डॉक्टर मधुकरराव राठोड ,बाबुराव अडकिने, भुजंगराव पा शिंदे, गजानन चौधरी , गणपतराव पा धुपेकर,जगदीश कदम, माधव कंधारे, यादवराव पा भेंलोडे, सय्यद जब्बार नरसीकर, संभाजी पा शिंदे , माधवराव पा शिंदे, प्रल्हाद पा शिंदे, यासह सर्व नगरसेवक तालुक्यातील कुंटूर नरसी बरबडा मांजरम सर्कलमधील पदअधिकारी, कार्यकर्ते यांचे हजारोच्या संख्येने उपस्थितीत होते. 

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या