सगरोळी येथे दिव्यांग वृध्द निराधार बोर्डाचे अनावरण आमदार अंतापुरकर व सं.अध्यक्ष चंपतराव डाकोरे यांच्या हस्ते संपन्न.

तालुक्यातील सगरोळी येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या शाखेचे उदघाटन मा आमदार अंतापुरकर व दिव्यांग स संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, यांच्या हस्ते करण्यात आले मा.आमदार साहेबाना पुढील कार्यक्रम असल्यामुळे तिथे त्यांचा शाल श्रीफळ देऊन संस्थापक अध्यक्ष यांनी सत्कार करून दिव्यांगाचा आमदार निधी देण्याची मागणी केली असता आमदार साहेबाना देण्याचे आश्वासन दिले.

माणिक प्रभु मठात दिव्यांग वृध्द निराधार मेळाव्याचे अध्यक्ष जि संपर्क प्रमुख नागोराव बंडे हे होते. प्रमुख पाहुणे जि अध्यक्ष ज्ञानेश्वर, नव़ले, ता.अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर, मुखेड ता अध्यक्ष आर एम कांबळे, बिलोली ता अध्यक्ष बालाजी होनपारखे सरपंच पञकार ईत्यादी पाहूण्याचा सत्कार गावकर्‍यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुञसंचलन शंकर म्हैञे यांनी केले.
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांच्या हक्काची जानिव शासन प्रशासनास व्हावी, म्हणून गाव तिथे शाखा उपक्रम नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गाव तेथे शाखा अभियान चालु असुन तळागाळातील दिव्यांग, वृध्द, निराधार बांधवांना संघटित करुन शासन प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी सगरोळी येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र अशा प्रकारे गाव तेथे शाखा स्थापन करून दिनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधार यांना दरमहा एक हजार अनुदान मिळते तेहि चार महिने मिळत नाही त्यात दूधाचे पाकिट मिळत नाही त्यासाठी आपल्या हक्कासाठी संघटितपणे लढाईत सामिल व्हावे असे डाकोरे पाटिल यांनी आव्हान केले.

दिव्यांग बांधवांचा राखिव पाच टक्के निधी देण्याचे आश्वासन सरपंच दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.स प्रमुख बंडू पाटिल यांनी संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नसल्याने डाकोरे पाटिल दिनदुबळ्याना न्याय देण्याचा प्रयत्न करतात तरी सर्वानी त्याचा सोबत संघटित होण्याचे आवाहन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर मेहत्री तालुका उपाध्यक्ष शाखा अध्यक्ष किसन चुनमवार सचिव रामलु मोगरेवार कोषाध्यक्ष अभिषेक पांचाळ सोपाले जयवंत पदमवार गंगाराम लक्ष्मीबाई गोरटेकर सहसचिव माचापुरे साईनाथ महादाबाई दोरनवाड गावातील संपूर्ण गावकरी मंडळी पत्रकार बांधव ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिद्ध पञक ता शोशल मिडीया प्रमुख राजेंद्र शेळके यानी दिली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या