आरळी येथील श्री गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष माननीय निळकंठराव पाटील दुडले तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस माननीय हाजप्पा पाटील सुंकलोड, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष शिवराज पाटील बोधने, प्रशालेचे मुख्याध्यापक मुकेशजी बोधनकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गंगाराम खंदारे, संचालक विठ्ठलराव लिंबुरे, शंकरराव सुंकलोड आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पार पडलेल्या भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी देशभक्तांवर विचार मांडले.
विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या वतीने रोख बक्षीस, पेन व वहीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निळकंठराव पाटील दुडले व प्रमुख पाहुणे हाजप्पा पाटील सुंकलोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु. श्रेया चिवटे हिने केले, तर‌ आभार अभिषेक नरहरे यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या