लोहयात १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन !

(विशेष प्रतिनिधी / रियाज पठान)
लोहयात १५ आगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य सतीश आणेराव मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहा येथे सलग ७ वर्षापासून सामाजिक बांधिलकी जोपासत भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान हे जीवदान वाचवी रूग्णाचे प्राण या म्हणीप्रमाणे सतीश आणेराव मित्रमंडळाच्या वतीने लोहयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
त्याच प्रमाणे यंदाही दि.१५ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सतीश आणेराव मित्रमंडळाच्या वतीने लोहा पोलीस स्टेशन समोर सकाळी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोहा तहसिलदार राम बोरगावकर, प्रशासकिय अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, डॉ.मिलिंद धनसडे,फौजी राम मानसपुरे , सेवानिवृत्त फौजी मिथुन भावे, यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले, उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, प्रा.डाॅ. संजय बालाघाटे,न.पा.गटनेता पंचशील कांबळे,मदन लांडगे, माजी नगरसेवक युवराज वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते दता शेटे, वंचित बहुजन आघाडीचे कंधार तालुकाध्यक्ष संतोष गवारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे लोहा तालुकाध्यक्ष तथा सतीश आणेराव मित्रमंडळाचे संस्थापक सतीश आणेराव यांनी केले आहे.

ताज्या बातम्या