भारतीय स्वातंत्र्य दिन शाळा,कॉलेज सरकारी कार्यालयात म्हसळा तालुक्यात साजरा !

(रायगड/म्हसळा प्रतिनिधी-प्रा.अंगद कांबळे)
स्वातंत्र दिन जिजामाता मराठी माध्यमिक शाळा वरवठणे या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. महादेव पाटील यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले या वेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

A. I. J. हाय.स्कुल व ज्यु कॉलेज म्हसळा या शाळेत ध्वजारोहण करण्यातआले या वेळी स्कुलकमेटीचे नसिर मिटकरे, अध्यक्ष फजल हलडे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

रा. जि. शाळा तोंडसुरे, या शाळेत श्री राजेश खटके सर यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मात्रे सर, दिपक सोनुले हे उपस्थित होते. रा. जि. प. शाळा वरवठने या शाळेत वृक्षरोपण करून स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला या वेळी मुख्याध्यापक शिक्षक, आशाताई उपस्थितीत होते.न्यू इंग्लिश स्कुल व ज्यु. कॉलेज म्हसळा येथे प्राचार्य मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कला व वाणिज्य ज्यु कॉलेज मेंदडी (कोंड ) या कॉलेज मध्ये प्रा. संदीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या