नरसी ग्रामपंचायततर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदिनानिमित्त स्वच्छतेसाठी घंटागाडीचे लोकार्पण !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील नरसी ग्रामपंचायत सतरा सदस्य संख्या असलेली मोठी ग्रामपंचायत असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्तान येथील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसदस्य, गावांतील प्रतिष्ठित ग्रामस्थ, यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 15 ऑगस्ट रोजी नरसी येथील ग्रामपंचायतीच्या भव्य प्रांगणात सरपंच पप्पू उर्फ गजानन भिलवंडे यांच्या ‌हस्ते महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,  यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण झाल्यानंतर स्वच्छता अभियान राबवण्यासाठी घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले. नरसी ग्रामपंचायतीच्या भव्य प्रांगणात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 15 ऑगस्ट रोजी ग्रामविकास अधिकारी, गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामसदस्य, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक नलबलवार व शाळेतील मूले, मूली, यांची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या