स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील तीन हात नाका व सॅटिसवर आकर्षक रोषणाई !

(ठाणे प्रतिनिधी – सुशिल मोहिते)
ठाणे महापालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील तीन हात नाका आणि सॅटिस परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

शहरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून ठाणे महापालिकेच्यावतीने तीन हात नाका सुशोभिकरण क्षेत्र आणि सॅटिस परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

हा संपूर्ण परिसर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.शहरातील नागरिकांसाठी हा परिसर आकर्षक सेल्फी पॉईंट ठरत असून नागरिकांची फोटो काढण्यासाठी गर्दी होत आहे.

ताज्या बातम्या