विधानसभा अपक्ष उमेदवार श्री.मधु गिरगावकर (सगरोळीकर) यांची डोर टू डोर भेट देत मतदारांशी संवाद !

श्री.मधु गिरगावकर सगरोळीकर म्हणून मतदार संघात मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवत स्वतः गिरगावकर आपला मोठ्या प्रमाणात प्रचार करत असल्याने त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवाराची डोकेदुखी वाढली असे मतदार संघात नागरिकांतून चर्चा ऐकायला मिळाली….!
( बिल़ोली प्रतिनिधी – सुनिल जेठे )
बिलोली शहरात दि ११ नोव्हेंबर रोजी विधानसभेचे अपक्ष उमेदवार श्री.मधु गिरगावकर (सगरोळीकर) यांनी डोर टू डोर भेट देत व्यावसायीकांशी संवाद साधत असतांना मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेतल्यानंतर त्या सोडवण्याचे गिरगावकर यांच्याकडून मतदारांना आश्वासन देण्यात आले .
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात बऱ्याच वर्षापासून विकासा बाबतीत प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न मार्गी लावणार का ? आणि सध्या महागाई वाढली आहे म्हणून त्यावर आपण विचार करावा असा प्रश्न किरकोळ हेयर सलोन व्यावसायीक सयाराम अष्टमवार कुंडलवाडीकर यांनी केला असता मधू गिरगावकर यांनी बोलताना, माझ्या प्रयत्नाने बिलोली तालुक्यातील बामणी येथे एम.आय.डीसीची मान्यता मिळवली, गेल्या पाच – सहा महिन्यात चार कारखाने सुरू झाली आहेत. क्र.९ वर माझी निशाणी ऊस शेतकरी आहे, येत्या २० तारखेला ऊस शेतकरी निशाणी बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. येत्या पाच वर्षांत ऊसाचे कारखाने उभारुन सुरक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचे मधू गिरगावकर म्हणाले.