खासदार आमदार यांना कोणी टार्गेट केलं जात नाही पण सरपंच यांना केलं जातं हे चुकीची बाब आहे, म्हणून मी नायगाव उमरी येथे आदर्श सरपंच म्हणून सरपंचांचा सन्मान केलेला आहे ग्रामपंचायतला प्राथमिक उपकेंद्र आणि वृद्धा आश्रम आपण निवडून आल्यानंतर या चांगल्या गोष्टीसाठी कटिबद्ध राहील !
– अपक्ष उमेदवार डॉ.मुकुंदराव पाटील बेलकर
[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आजवर विविध पक्षाचे आमदार निवडून आले पण आपल्या स्वार्थाचे भले करून ठेवले, लोकप्रतिनिधींनी स्वार्थ आपल्या मनात ठेवला की विकासाची कामे साध्य होत नाहीत असे चित्र आज सर्वत्र दिसत आहे म्हणून आदर्श मतदारसंघ आणि आदर्श आमदार कसा असतो तुम्ही संधी दिल्यानंतर निश्चितच दाखवून देईल,ज्यांच्याकडे आचार विचार आहेत अशा उमेदवारांना मतदान करणे योग्य ठरेल असे प्रखड मत पुरोगामी सरपंच संघटनेचे अध्यक्ष डॉ. मुकुंदराव पाटील बेलकर यांनी आयोजित पत्रकार परिषद मध्ये व्यक्त केले.
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर मुकुंदराव पाटील बेलकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले की,ज्यांनी शेतकऱ्याच्या हिताच्या गप्पा मारतात शेतकऱ्यांनी शेअर्स भरून उभारलेला कारखाना बंद पाडला, बँक खाऊन टाकल्या, सूतगिरणी बंद पाडली अशा नेत्याकडून मतदारांनी काय अपेक्षा करावी शेतकरी शेतमजूर कष्टकरी सर्व शोषित लोकांच्या हितासाठी यांनी चांगले विचार घेऊन आजवर पुढे आलेच नाहीत विचारातून देश स्वतंत्र झाला आणि त्या स्वतंत्र्याची फळे मात्र खाणारे हे लोक आहेत असे सांगत ते पुढे म्हणाले की मी आजवर कुठलाच स्वार्थ ठेवलेला नाही मंदिरे उभे केली आणि विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना घडविले दोन मुले पायलट केली तर आठ मुले अधिकारी बनवले, कित्येक ठिकाणी अन्नदान केले. एखादा खासदार आमदार एक कार्यकर्त्याला घडविला का सांगा असाही प्रश्न डॉक्टर बेलकर पाटील यांनी करीत मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे निश्चितच माझ्या कार्याची पावती जनता मला देईल यावर माझा विश्वास आहे असे ते म्हणाले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy