कुंडलवाडी नगरपरिषदे अंतर्गत’इंडियन स्वच्छता लीग’ पंधरवडा आयोजन

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
             स्वच्छ भारत अभियान 2.0 (नागरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय,भारत सरकारच्या माध्यमातून दि. 15 सप्टेबर 2023 ते दि. 02 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा अभियान आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.या अनुषंगाने या अभियानाचा एक भाग असलेल्या “इंडियन स्वच्छता लीग 2.0 चा दुसरा हंगाम सुरु झाला आहे, सदरील अभियानामध्ये नगर परिषद कुंडलवाडी ने ‘केआरपीएस वारीयर्स’ या नावाने सहभाग घेतला असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी आर जी चौहान यांनी दिली आहे.
      कुंडलवाडी नगरपरिषदे अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान 2.0 ‘ या अभियानात केआरपीएस वारीयर्स या टीमचे कॅप्टन म्हणून शहरातील के.रामलू पब्लिक स्कुल या शाळेचे सहशिक्षक राजेश कागळे, पंधरवडा स्वच्छता अभियानेचे Brand Ambassador म्हणून श्रीमती. रमा साईरेड्डी ठक्कुरवार यांची नियुक्ती नगरपरिषदेने केली आहे तर दिनांक 17 सप्टेबर रोजी शहरात आयोजित करण्यात आलेल्या इंडियन स्वच्छता लीग 2.0 या स्वच्छता अभियानात शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी आर जी चौहान,केआरपीएस वारीयर्स टीमचे कॅप्टन राजेश कागळे यांनी केले आहे.सदरील अभियान यशस्वी करण्यासाठी नगर परीषदेचे सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या