भारतीय संविधानातील हक्क अधिकार समजुन घेतली तरच यशाच शीखर गाठता येईल- समतादुत शारदा माळे !

[ नांदेड – इंद्रजीत डुमणे ] देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील आपले हक्क, अधिकाऱ,व कर्तव्य समजुन घेऊन आपली प्नगती करावी असे मत समतादुत श्रीमती शारदा माळे यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्वायत संस्था डाॅ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या बिलोली तालुका समतादुत श्रीमती शारदा माळे यांनी भारतीय संविधानातील मुलभुत हक्क अधिकार कर्तव्य यावर प्रबोधन कार्यक्रम बिलोली तालुक्यातील रुद्रावर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजीत केला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक हीप्पर ए.बी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन बि.एम.बरबडे (सहशिक्षक), श्रीमती मामीडवार (सहशिक्षिका), यांच्या सह शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थीत होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या