भारतीय मानव अधिकार परिषद बिलोली तालुकाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिरगीरे यांची निवड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
भारतीय मानव अधिकार परिषद बिलोली तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिरगीरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. भारतीय मानव अधिकार आयोगची स्थापना 12 ऑक्टोबर रोजी मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 च्या कायद्या अंतर्गत करण्यात आली.
आहे हि संघटना राष्ट्रीय पातळीवर मानले जाते म्हणून त्या अनुषंगाने सामाजीक क्षेत्रात चांगली ओळख निर्माण करनारे तथा पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन भारतीय मानव अधिकार परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष एस के शर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष इस्माईल शेख, मराठवाडा अध्यक्ष महंमद ताहेर, यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात भारतीय मानव अधिकार परिषद तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिरगीरे यांची नियुक्तीचे पत्र देऊन जबाबदारी सोपवली आहे. या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या