अन्यायग्रस्त आदिवाशीच्या महाप्रबोधन मेळाव्यास हजारों कार्यकर्ते जाणार – प्रल्हाद मदेवाड !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
          नांदेड येथे दि. ५ फेब्रुवारी २०२३ रविवारी रोजी सकाळी ११ वाजता श्रीकृष्ण मंगल कार्यालय , संदीपाणी ,पब्लिक स्कुल जवळ तरोडा (बु) चैतन्यनगर रोड नांदेड येथे होणाऱ्या आदिवासी कोळी महादेव व मन्नेरवारलू समाजाच्या अन्यायग्रस्त आदिवासींचा महाप्रबोधन
मेळाव्यास नांदेड जिल्ह्यातील सर्व महिला ,युवक ,युवतींनी व समाजबांधवांनी मेळाव्यास हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोळी महासंघाचे प्रल्हाद मदेवाड ,सूर्यकांत पोलकंमवाड यांनी आवाहन केले आहे.
            प्रबोधन मेळाव्यास आमदार गोपीचंद पडळकर बहुजनांचे व अन्यायग्रस्त ३३ जमातीचे दैवत व बुलंद आवाज ,आमदार रमेश पाटील समाजांचा बुलंद आवाज व राष्ट्रीय अध्यक्ष कोळी महासंघ , प्रा.डा. शरणकुमार खानापुरे
आंतरराष्ट्रीय मानव अधिकार आयोग, जिल्हाध्यक्ष कोल्हापुर ,
आ.डॉ. तुषार राठोड ,आ.राम पाटील रातोळीकर ,आ.माधवराव पाटील जवळगांवकर , आ.मोहन अण्णा हंबर्डे , आ. बालाजी कल्याणकर नांदेड ,आ.श्यामसुंदर शिंदे लोहा, आ. राजेश पवार नायगांव धर्माबाद – उमरी मतदार संघ , आ. जितेश अंतापूरकर ,
माजी आ. गंगारामजी ठक्करवाड , परेशजी कोळी अध्यक्ष, अ.भा.आ.को. स. महाराष्ट्र राज्य , नागनाथरावजी घिसेवाड समाज नेते आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
नांदेड येथे दिनांक ५ फेब्रुवारी राजी होणाऱ्या प्रबोधन मेळाव्यास नांदेड जिल्ह्यात महिला, युवक , युवती व सर्व समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे असे अवहान प्रल्हाद मदेवाड युवा जिल्हाध्यक्ष कोळी महासंघ , सूर्यकांत पोलकंमवाड युवा तालुकाध्यक्ष कोळी महासंघ बिलोली , हणमंत बोईनवाड नगरसेवक नायगाव ,देविदास तमनबोईनवाड ,तालुकाध्यक्ष नायगाव कोळी महासंघ यांनी केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या