सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानाचे बोगस बांधकामाच्या चौकशीची मागणी !

[नायगाव बा.तालुका प्रतिनिधी-गजानन चौधरी]
नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या बांधकामात बेसमेंट मध्ये मुरूम ऐवजी काळी माती वापरल्याने संबंधित कामाच्या चौकशीसाठी आमरण उपोषण चालू झाले आहे.

नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या वतीने कोट्यावधी रुपये खर्च करून सुसज्ज असे निवासस्थानाचे बांधकाम खाजगी कंत्राटदार मयूर माणिकराव हेंद्रे यांना शासनाच्या वतीने देण्यात आले.

परंतु सदरील भ्रष्ट गुत्तेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासनाने नेमून दिलेल्या निविदाप्रमाणे काम न करता बोगस बांधकामात बेसमेंट मध्ये मुरूमाचा वापर न करता काळी मातीचे वापर करण्यात आल्याने सदरील वापरलेले माती काढून मुरमाचा भर वापरण्यात यावा व सदरील कामाची चौकशी करून संबंधितावर कडक कारवाईच्या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश हनमंते यांनी आमरण उपोषण सुरू केल आहे.

 त्याचे निवेदन 9 डिसेंबर रोजी देण्यात आले होते. परंतु भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिनांक 12 डिसेंबर रोजी प्रकाश हनमंते यांनी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे. 13 डिसेंबर रोजी अवकाळी पावसात उपोषण चालूच होते. तरीही या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी सदैव कामाची चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या