महावितरणची तात्काळ विजकनेक्शन योजनेचा अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथून शुभारंभ

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील ]
आजपासुन माहावितरण कंपनीकडून रायगड जिल्ह्यामध्ये नविन ग्राहकांना २४ तासात तत्काळ विज कनेक्शन देण्याची योजनेची सुरूवात पोयनाड, अलिबाग येथिल कार्यलयातून करण्यात आली. महावितरणचे रायगड अधिक्षक अभियंता मुळाणी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य श्री देवव्रत विष्णु पाटील यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलिबाग 2 चे कार्यकारी अभियंता अंबाडे यांनी केले . 

 देवव्रत पाटील. यांनी महावितरणाच्या या स्तुत्य योजनेचे कौतुक करत ही योजना अखंडपणे चालू राहील अशी आशा व्यक्त करत महावितरण इतर हि सुविधा याप्रकारेच तत्काळ देईल असे मत कार्यकामाच्या दरम्यान व्यक्त करत ग्राहकांच्या वतीने मुळानी साहेबांचे धन्यवाद मानले. तर मुळानी साहेबांनी यापुढे महावितरण जास्तित जास्त ग्राहकाभिमुक कार्य करेल आशी गाॅही दिली. यावेळी ग्राहकांना नविन विज मिटर देऊन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ग्राहकचे प्रतीनीधी राजेश टेमकर, पोयनाड १ व २, कुसुंबळे, चरी येथिल शाखा अभियंता आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या