शासनाकडून दिव्यांग साठी आलेले साहित्य वाटप न झाल्यामुळे दिव्यांग कडून पुंगी बजाव आंदोलन व उपोषण इशारा !

[ नायगाव बाजार – गजानन चौधरी ]
शासनाकडून दिव्यांगासाठी आलेले साहित्य वाटप न झाल्यामुळे नायगाव तालुक्यातील दिव्यांग संघटनेच्या वतीने पुंगीबजाव आंदोलन उपोषणाचा इशारा गट विकास अधिकारी यांना निवेदनाद्वार दिला आहे सामाजिक न्याय अधिकार मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृत्रिम अंग निर्माण जिल्हा प्रशासन नांदेड , जिल्हा पुनर्वसन केंद्र जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणे अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आलेले विविध साहित्य कडून 2019 मध्ये नायगाव पंचायत समिती अंतर्गत आलेले साहित्य आमदार राजेश पवार व दिवंगत डी बी पाटील होटाळकर यांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
होते यावेळी आमदार राजेश पवार यांनी आपल्या भाषणात म्हणाले होते की दिव्यांगाने मिळणारा 5% चा निधी 18 लाख रुपये मी लवकरच वाटप करेल परंतु निधी व राहिलेले साहित्याचे अद्यापही दिव्यांगाना वाटप न झाल्यामुळे गंजलेले अवस्थेत धूळ खात पडून आहे परंतु लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे व पंचायत समितीचे भ्रष्ट अधिकारी यांच्या कडे दिव्यांग लाभार्थ्यांनी चक्रा मारूनही साहित्याचे वाटप न झाल्यामुळे अखेर नाराज झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी यांना दिनांक 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत साहित्य वाटप न झाल्यास नायगांव पंचायत समिती समोर दिनांक 7 मार्च 2022 रोजी पुंगी बजाव आंदोलन व उपोषण करण्याचा निवेदनाद्वारे इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या तालुका अध्यक्ष साईनाथ बोईनवाड, व गोपाळ आंबटवाड,राजेश बेळगे, संभाजी चव्हाण, मारुती मंगरुळे, माधव कसबे ,रामदास भाकरे, चंदूआंबटवाड, संभाजी चव्हाण ,विश्वंभर बोयाळ,अशोक वने, सुधाकर पांचाळ ,लक्ष्मण तमसुरे ,हनुमंत तमसुरे यांच्या वतीने दिला आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या