आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. प्रतिभा तक्कडपल्ली सेवा भारत पुरस्काराने सन्मानित

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
            येथील के .रामलू पब्लिक स्कूलचे प्राचार्य टी. नरसिंगराव यांची सुकन्या आंतरराष्ट्रीय बॉक्सर पटू कु. प्रतिभा नरसिंगराव तक्कडपल्ली यांना नुकतेच तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे सेवा भारत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  
            याबाबत माहिती अशी की, तेलंगणा प्रदेशातील कामारेडी जिल्ह्यातील पिटलंम येथील रहिवासी असलेल्या कु. प्रतिभा नरसिंगराव तक्कडपल्ली यांचे क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील उतुंग भरारी पाहून व त्यांनी आपल्या तेलंगणा प्रदेशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेल्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊन तसेच त्यांनी अनाथ मुलींना संरक्षणाचे प्रशिक्षण देऊन देशाची सेवा करण्यासाठी प्रतिभा तकडपल्ली यांना दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी तेलंगणा प्रदेशाची राजधानी हैदराबाद येथे तेलंगणा भाषा, सांस्कृतिक विभाग आणि एन. एम. डी .सी व हेवेन होम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा भारत पुरस्कार हे महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांसाठी आदर्श म्हणून उभे राहिल्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार प्राप्त बद्दल कु. प्रतिभा तक्कडपल्ली यांनी सौ. वर लक्ष्मी यांचे विशेष आभार मानले. तर कु. प्रतिभा तकडपल्ली यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने के. रामलु पब्लिक स्कूलचे अध्यक्ष सायरेडी ठकूरवार, संचालिका सौ.रमा ठकूरवार, मु.अ. पापया मठवाले, पर्यवेक्षक राजेश कागळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या