जागतिक महिला दिना निमित्त महिला मेळावा नगर परिषद उमरी यांचे वतीने आयोजित करण्यात आला.

[ प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
संविधान अमृत महोत्सव अंतर्गत घर घर संविधान कार्यक्रम समारोप आणि माझी वसुंधरा अभियान 5.0, स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 तसेच बक्षिस वितरण व जागतिक महिला दिना निमित्त महिला मेळावा नगर परिषद उमरी यांचे वतीने आयोजित करण्यात आला.

या वेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्रीमती स्वाती दाभाडे उपविभागीय अधिकारी, धर्माबाद तथा प्रशासक नगर परिषद उमरी उपस्थ‍ित होते, तसेच प्रमुख पाहुने म्हणुन जाईताई कैलासराव देशमुख गोरठेकर, दीपेश मढी भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक, दिपाली मामीडवार माजी नगर सेवक, श्रीमती अनुसायाबाई कटकदवने माजी नगर सेवक, डॉ भाकरे मॅडम, अनुराधा कुलकर्णी प्राचार्य,स्वाती वच्छेवार प्राचार्य, शुभांगी माळवतकर प्राचार्य, मिरासे कृषी अधिकारी, पदमावार दुय्यम निबंधक, कुलकर्णी गटशिक्षण अधिकारी, डॉ.अर्जुन शिंदे, ॲड गुडाळे मॅडम, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार,अनिल दर्डा माजी नगर सेवक, सोनु वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते, डॉ.जाधव, कैलास सोनकांबळे पत्रकार, फेरोज पेटल पत्रकार यांची उपस्थ‍िती होती.
सदर कार्यक्रमात विशेष कार्य पुरस्कार म्हणुन मा.संजीव विठ्ठलराव सवई, शासकीय कंत्राटदार, उमरी जि.नांदेड व मारवाडी युवामंच यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 दीन दयाळ अंत्योदय योजने अंतर्गत शहरातील 06 महिला बचत गटांना प्रत्येकी 03 लक्ष रुपये मंजुरी आदेश देण्यात आले तसेच संविधान अमृत महोत्सव अंतर्गत घर घर संविधान कार्यक्रम व माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध/चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे बक्षिस विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
तसेच उमरी शहरातील महिला व नागरीक विविध पक्षातिल पदअधिकारी व पत्रकार व शासकीय अधिकारी यांना पर्यावरणाचे रक्षण होण्याचे द्दष्टीने प्लास्टिक बंदी होण्याच्या अनुषगांने संविधान प्रत,कापडी पिशव्या,वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला आहे.
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत भूमी,` वायु, जल,अग्नि व आकाश ह्या पंचतत्वांचे मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात आले आहे. त्यावेळी श्रीमती निलम कांबळे.मुख्याधिकारी नगर परिषद उमरी यांनी प्रस्ताविक केले व सूत्रसंचालन डी.एम कांबळे सर सहशिक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश मदने वरिष्ठ लिपिक यांनी मांडले यावेळी शहरातील महिला,नागरीक विद्यार्थी/विद्यार्थीनी मोठया संख्यंने उपस्थ‍ित होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करणेसाठी उमरी नगरपरिषद अधिकारी/कर्मचारी घनकचरा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या