बिलोली पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान..

[ बिलोली प्र – सुनील जेठे ]
अंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस ठाणे बिलोली येथे दि.८ मार्च २०२५ रोजी पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या हस्ते महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे पुष्पहाराने सन्मान करून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आले .
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बिलोली पोलीस ठाणे येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला,आजच्या युगात स्त्री ही फक्त चुल-मुल एवढे नाही तर कधी ही पुरुषांपेक्षा स्त्रिच प्रगशिल आहे,प्रत्येक क्षेत्रात स्त्रि पोहोचली पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत,त्या प्रमाणे कर्तव्यदक्ष निष्ठावंत महिला पोलिस अधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या शुभांगी साळुंखे,सय्यद मॅडम यांनी पुरुष पोलिस बांधवांच्या खांद्याला खांदा लावून जनतेच्या सुरक्षेसाठी कार्य करत आहेत,म्हणून महिला पोलीस कर्मचारी,महिला होमगार्ड यांचा आदर पुर्वक सत्कार व सन्मान पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी करून या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिले.
यावेळी पोलीस कर्मचारी मारोती मुद्दमवाड, प्रभाकर गुडमलवार, शिंदे पाटील, पो.हे.का. गायकवाड कुमार,गजानन अनमुलवार, माधव जळकोटे, होमगार्ड मारोती जेठे,मारोती मालुसरे यांच्यासह अदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या