के रामलू पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून के रामलू पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातील थोर समाजसेविका, शुर महिला यांचे वेशभूषा परीधान करून त्यांच्या चरीत्राचे भाषण स्वरूपात वर्णन केले.
शाळेच्या वतीने सर्व महिला शिक्षिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या संचालिका रमा ठककुरवार मॅडम होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विद्या ताटे यांनी केले तर आभार प्रदर्शन कागळे सर यांनी केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या