नायगाव येथे महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा घेऊन केला महिलेचा सन्मान !

[ नायगाव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील मार्कंडेश्वर मंदिर मध्ये महिला दिनानिमित्त नायगाव तालुका पद्मशाली महिला संघटने तर्फे महिला दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.या सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. संगिता बालाजी वंगावार या तर कार्यक्रमाच्या अतिथी व मार्गदर्शिका योग तज्ञ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नांदेड च्या महिला अध्यक्षा सौ. यशोदा राम येम्मेवार या होत्या व प्रमुख पाहुण्या नायगाव नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.अर्चणा संजय पाटील चव्हाण व जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या महिला अध्यक्षा सौ.महानंदा गायकवाड या मान्यवरांची उपस्थिती होती ह्या कार्यक्रमात पद्मशाली महिला संघटने तर्फे महिला साठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या मध्ये संगीत खुर्ची या स्पर्धेत प्रथम क्रमांक चंद्रकला बिरेवार व द्वितीय क्रमांक मीना ताटेवाड यांनी पटकाविला तर तळ्यात मळ्यात या स्पर्धेत ज्योती मानचूरे व द्वितीय क्रमांक ज्योती रामदिनेवार यांनी पटकाविला व लहान गटातील मुलांच्या संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रेया निलेश बिरेवार तर द्वितीय क्रमांक आराध्या आलेवार यांनी पटकाविला. या विविध प्रकारच्या स्पर्धा मुळे सर्व स्त्रियांनी भरभरून आनंद घेतला. त्याच बरोबर योग तज्ञ सौ. यशोदा राम येम्मेवार यांनी योग संदर्भात मोलाचे मार्गदर्शन देवून सर्वाना कडून योग करून घेतला.
सौ.महानंदा गायकवाड यांनी स्त्रीयांना स्वावलंबी व्हा, स्वतःची ओळख बनवा असे सांगत विविध थोर समाजसेविकांचे उदाहरण दिले आणि बचत गट बदल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन करण्याऱ्या नायगाव तालुका पद्मशाली महिला संघटने च्या अध्यक्षा सौ. अनुसया संभाजी नर्तावार , उपाध्यक्ष सौ. स्नेहलता साईनाथ चन्नावार सौ.संगीता लखपत्रेवार, कार्याध्यक्ष सौ. गोदावरी अलसटवार, सौ संगीता वंगावार, उपसचिव सौ. चंद्रकला बिरेवार, सौ स्वाती कोंपलवार , सौ.मीनाक्षी संग्रपवार, सदस्य सौ. ज्योति रामदिनेवार सौ.मिनाक्षी अलसटवार सौ. ऐश्वर्या बुध्दलवार,सौ. रंजना आलेवार सौ.आशा अडबलवार सौ. बालेश्वरी कोकुलवार यांचा समावेश होता.विशेष सत्कार सन्मान नायगाव तालुका पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा त्यात नायगाव नगरीचे प्रथम नागरिक नायगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.अर्चना संजय पाटील चव्हाण, योग तज्ञ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नांदेड जिल्हा अध्यक्षा यशोधाताई राम येमेवार, जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्षा तथा महिला बचत गट अध्यक्षा महानंदाताई गायकवाड, नायगाव तालुका पद्मशाली समाज महिला संघटनेच्या तालुकाध्यक्षा अनुसयाताई संभाजी नर्तावार , समाजसेविका फुलारी ताई, मार्कण्डेय मंदिर पुजारी गुरुमाय या सर्व महिलांचा नारीशक्ती चा सत्कार व सन्मान नायगाव तालुका पद्मशाली समाज संघटना तालुकाध्यक्ष लक्ष्मण चन्नावार, तुळशिरामजी बिरेवार, तालूका कोषाध्यक्ष बालाजी वंगावार, तालूका सचिव तथा मार्कण्डेय मंदिर समिती अध्यक्ष नायगाव निलेश बिरेवार, तालूका सहसचिव शिवाजी रामदिनेवार सर,तालूका सदस्य दत्तात्रय आंबटवार, युवक कोषाध्यक्ष साईनाथ आलेवार, तालूका सहसचिव बालराज चलमेवार तालूका संघटक प्रकाश लखपत्रेवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या