जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मौजे चिंचोली येथे जागतिक महिला दिनाच्या दिवशी साईनाथ गंगाराम वासनिकर,व महादु गंगाराम काळे यांच्या घरी जन्म घेतलेल्या दोन मुलींना व त्याच्या आईवडिलांना कपडेरूपी आहेर करून पोषक आहार वाटप करण्यात आला .
सविस्तर व्रत असे की मौजे चिंचोली या गावात दोन मुलीनी जन्म घेतला बेटी बचाव बेटी पढाव या शासकीय ब्रिद वाक्याची आमलबजावणी झाली पाहिजे व ते वास्तविक जिवनात आचरणात आले पाहिजे या मुळ हेतुने चिंचोली येथील नवनिर्वाचित सरपंच ऋषिकेश लक्ष्मणराव गुंडाळे,उपसरपंच दिंगबर दत्ता वासनिकर,व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांनी हा नवीन उपक्रम राबविला.यांच्या या आदर्श विचांराचे गावकऱ्यांनी मनभरून कौतुक केले .
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy