(डॉ.विजय निलावार) हिंगोली येथील बालाजी मित्र मंडळाच्या वतीने आर्य वैश्य समाजातील आंतरराज्यस्तरीय उपवधू उपवर प्रथमच परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे तर इच्छुकांसाठी मोफत लग्न लावणार असल्याने हिंगोली येथे आर्यवैश्य समाज बांधव आणि भगिनींनी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संकल्प केला आहे.सदरील मेळावा २३ मार्च रोजी हिंगोली अकोला हायवे शेजारी असलेल्या भव्य तिरुमला लॉन मधे आयोजित केला असून केवळ २५० उपवधू आणि २५० उपवरांची सशुल्क ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे आयोजक बालाजी मित्र मंडळ हिंगोली परिवारात सर्व सदस्य समान असून ह्यात कुणीही वरिष्ठ अथवा कनिष्ठ पदाधिकारी नाही. संगठित रित्या बालाजी मित्र मंडळ आणि आर्य वैश्य समाजातील सर्व मंडळी” शोध जोडीदाराचा” उपवधू उपवर मेळावा यशस्वीतेसाठी झटत असल्याचं समाज बांधव, भगिनी, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या बैठकीत स्पष्ट झालं.हिंगोली येथील आर्य वैश्य समाज भवनात नुकत्याच झालेल्या बैठकीत उपस्थितांनी आर्य वैश्य समाजातील विवाह इच्छुकांसाठी आयोजित आंतरराज्य स्तरावरील मेळावा यशस्वीतेसाठी तन मन धनाने सहयोग देण्याचे आश्र्वासित केलं. हिंगोली चे भूमिपुत्र उद्योगपती प्रशांत निलावार व सौ.सीमा निलावार ह्यांनी प्रकाश राजभाऊ निलावार ह्यांच्या स्मरणार्थ दहा लाख रु. सर्वाधिक देणगी सेवच्छेने दिल्याने बालाजी मित्र मंडळ आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार ह्यांनी त्यांच्या दानशूर वृत्ती बद्दल आभार मानले आहेत.
सदरील मेळाव्यात लग्न जुळून आलेल्यांची ईच्छा असेल तर ह्यासाठी देखील आणखी मदत देईन अस सौ.सीमा व प्रशांत निलावार ह्यांनी जाहीर केलं आहे.खासदार विलासराव गुंडेवार ह्यांचे सुपुत्र ऍड.स्वप्नील विलासराव गुंडेवार ह्यांनी देखील मेळाव्यात २ लग्न करून देणार असे जाहीर केले आहे. हिंगोलीतील समाजसेवक सर्वश्री सौरभ संजय काप्रतवार ,अभय दामोदर चक्रवार डॉ.विक्रांत लक्ष्मीकांत व्यवहारे ह्यांनी प्रत्येकी ५१ हजार रु.दिले आहेत.तर लक्ष्मीकांत विश्वनाथ व्यवहारे ह्यांनी एक दिवसासाठी त्यांची विक्रांत डीलक्स लॉज व गजानन रामभाऊ बासटवार यांनी साई लॉज मोफत दिली आहे, डॉ. निलेश लक्ष्मणराव गुंडेवार व डॉ. स्वाती निलेश गुंडेवार ह्यांनी मेळाव्यासाठी संपूर्ण वैद्यकीय मदत,रामेश्वर गजानन बासटवार मेळाव्या दरम्यान लागणाऱ्या सर्व मोफत औषधी,शशीशेखर दामोदर बासटवार मेळाव्यात दिवसभर समाज बांधवांसाठी चिवडा मोफत,श्रीमती वैशाली शाम गुंडेवार रुपये ५ हजार,स्मरणिका जाहिरातीसाठी डॉ. गोपाल महाजन रुपये ५ हजार, प्राप्त झालेले आहेत विशेष म्हणजे मदत मागण्यास कुणीही न जाता स्वेच्छेने लोकसहभागातून आर्थिक योगदान,स्मरणिका निर्मिती साठी जाहिराती ,व आपापल्या परीने सेवा देण्याचा ओघ सुरूच असल्याने आर्य वैश्य समाज बांधवांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.
हिंगोलीत प्रथमच आंतर राज्यस्तरावरील हा उपवधु उपवर मेळावा सामाजिक बांधिलकी च्या उद्दिष्ट्य पूर्तीसाठी आर्य वैश्य समाजातील सर्व पुरुष,महिला,युवक युवती,संघटनानी योगदान द्यावे व ऐतीहासिक नोंद करावी अस आवाहन आयोजक बालाजी मित्र मंडळाच्या वतीने गिरीश गुंडेवार व बालाजी मित्र मंडळाच्या सर्व विश्र्वस्थानी केले आहे.मदतीचा ओघ सुरू असून आर्य वैश्य समाज बांधव आणि भगिनी कडून बालाजी मित्र मंडळा कडे आमच्या कडून काय मदत अपेक्षित आहे ह्या बद्दल विचारणां केली जात आहे ,हे विशेष होय. बालाजी मित्र मंडळाने जाहीर केलेल्या लिंक वरून नोंदणी करावी अस आवाहन करण्यात आले आहे.सन्माननीय देणगीदार ह्यांनी मोठे योगदान जाहीर केले त्याप्रित्यर्थ त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.मेळाव्यात सशुल्क नोंदणी केलेल्या उपवधू उपवरा सह सोबतच्या अन्य दोघांना प्रवेश, वैद्यकीय सेवा,नाश्ता,दिवसभर चहापाणी,दोन वेळ सुग्रास भोजन,भव्य दिव्य अत्याधुनिक रॅम्प, दृक श्राव्य परिचय यंत्रणा,आवश्यक त्या सर्व सुविधा,विविध निःशुल्क आणि सशुल्क स्टॉल्स,आदी सुविधा देण्यात येणार आहेत.मेळाव्यात स्थानिक समाज बांधव भगिनी आणि परीवार जणांना निःशुल्क प्रवेश व सुविधा देण्यात येणार आहेत.हिंगोलितील समाज बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने २३ मार्च ला बंद ठेवून मेळाव्यातील निःशुल्क सेवेचा लाभ घ्याव्यात आणि उत्कृष्ट स्वंयसेवक म्हणून मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सेवा द्याव्यात अस आवाहन बालाजी मित्र मंडळाचे गिरीश गुंडेवार,आनंद निलावार,ऍड अशोक डूब्बेवार व सर्व विश्वस्त आणि आर्य वैश्य समाज बांधवांनी केले आहे.
योगदान दिल्या बद्दल त्या सर्व समाजसेवकांचा सत्कार बालाजी मित्र मंडळां कडून ज्येष्ठ समाजसेवकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .आवश्यक त्या समित्या मधे आपापल्या आवडी नुसार स्वंयसेवक म्हणून सेवा देणाऱ्या समाज सेवकांनी बालाजी मित्र मंडळाच्या सदस्या कडे आपली नाव देवून सहकार्य करावं अस आवाहन करण्यात आल्याने अनेकांनी आपापली नाव सेवा देण्यासाठी नोंदवली.बालाजी मित्र मंडळाचे गिरीश गुंडेवार,आनंद निलावार,ऍड अशोक डूब्बेवार ,ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार,अशोक बासटवार ,लक्ष्मीकांत व्यवहारे, प्रा. अरुण पापंटवार अक्षय बासटवार,सौ.सुलभा बासटवार,सौ. अरुणा गुंडेवार, ८६ वर्षाच्या श्रीमती सुमन शरदराव गुंडेवार,सूरज मामडे, सूरज सामशेट्टीवार,आदींनी आपापल्या मनोगतातून व्यक्त केलं.बैठकीचा शुभारंभ आर्य वैश्य कुलस्वामिनी माता वासवी कन्यका परमेश्वरी व सद्गुरू रंगनाथ महाराज ह्यांचे प्रतिमा पूजन ज्येष्ठ समाज सेवक नंदकुमार गुंडेवार गिरीश गुंडेवार ह्यांच्या हस्ते करून झाली. महासभा बांधकाम समिती उपाध्यक्ष म्हणून सचिन गुंडेवार व राज्य करी करिनी सदस्य म्हणून ज्ञानेश्वर मामडे , महासभा जिल्हाध्यक्ष गिरीश गुंडेवार,महासचिव आनंद निलावार,कोषाध्यक्ष ऍड अशोक डूब्बेवार ह्यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.संचालन ज्येष्ठ पत्रकार डॉ.विजय निलावार तर आभार राहुल निलावार ह्यांनी मानले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy