राज्याचे लोकप्रिय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते आर्य वैश्य समाज उपवर उपवधू परिचय मेळावा संपन्न !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड येथील नगरेश्वर मंदिर वतिने आयोजित नांदेड येथील चांदोबा मंगल कार्यालय मध्ये 49 वा आर्य वैश्य समाज बांधवांच्या वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन झाले.

राज्याचे वन्य व मत्स्य मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच हिंगणघाट चे आमदार सुधीर कुणावार, काशी अन्नपूर्णाचे सचिव विलास बच्चू , महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकुर्ते, बिपिन गादेवार, बालाजी बच्चेवार, लक्ष्मीकांत मुक्कावार, दत्तात्रय पारसेवार ,बालाजी येरावार, यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत वासवी माता व रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन उद्घाटन करण्यात आले.

  यावेळी महाराष्ट्र, आंध्रा, कर्नाटक, विदर्भ राज्यातून वधू वर मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. परिचय मेळाव्यात 400 वधू व वर यांनी आपला परिचय दिला. यावेळी उद्घाटन पर भाषणामध्ये वन्य व मत्स्य मंत्री सुधीर भाऊ मंदिर समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करून आपला समाज सर्व क्षेत्रांमध्ये प्रिय होत असून ते समाजासाठी उल्लेखनीय बाब आहे सूत्रसंचालन बासरी व बंडेवार यांनी केले.

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या