नांदेड येथील नगरेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित आर्य वैश्य वधु वर परिचय मेळावा चांदोबा पावडे मंगल कार्यालयात दुसऱ्या दिवशी थाटात संपन्न झाला. आर्य वैश्य समाजाचे कुलस्वामिनी कन्या परमेश्वरी वासवी माता व परमपूज्य रंगनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरती झाल्यानंतर सकाळी आठ वाजता परिचय मेळाव्यात आलेल्या वर वधू यांनी गेट-टुगेदर कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
परिचय मेळावा ची सुरुवात नगरेश्वर मंदिर चे हिंगणघाट चे आमदार समीर कुनावार, यांच्या प्रमुख उपस्थित मंदिरचे अध्यक्ष सुभाषजी कन्नावार, दिलीपजी कंदकर्ते एकनाथराव मामडे गोविंदराव बिडवई, अनिल मनाठकर, किरण वट्टमवार, मेळावा प्रमुख प्रणव मनुरवार, भागवत गंगमवार, लक्ष्मीकांत अमिलकंठवार,शंतनू कोटगिरे, श्याम गंदेवार , अशोक व्यवहारे, संजय नालदकर, नारायण दाच्यावार, विनायक उज्वल महाजन अंबादास कवटीकवार, सुजित गादेवार ,गणेश गादेवार,रायेवार ,दिनेश भास्करवार, गिरीश मोगडपल्ली, संजय जवाद्वार ,लक्ष्मीकांत बंडेवार वंदना कोटगिरे,सागर पेकम, डॉक्टर वेंकटेश दुबे, स्वप्निल शक्करवार, सुमित केशटवार, यांच्यासह सर्व नगरेश्वर मंदिराचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मेळाव्यामध्ये नेमून दिलेल्या विविध समित्यामध्ये काम करणाऱ्यांचा गौरव वधु वर परिचय मेळाव्यानंतर करण्यात आला.
समितीच्या वतीने सकाळचा नाश्ता, दुपारचे शाही भोजन व्यवस्था मेळाव्यात आलेल्याना देण्यात आले या मेळाव्यास आंध्रा महाराष्ट्र विदर्भ तीनही प्रांतातून मोठ्या संख्येने वधू वर व त्यांचे आई वडील आदींची हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy