तमनाथ रेशन दुकानात होणाऱ्या काळ्याबाजाराची सखोल चौकशी करा – सुशील भाई जाधव

[ कर्जत, दि 12 नोव्हेंबर ]

गरिबांना आधार देणारे रास्त भाव रेशनिंग दुकानांमध्ये अनेक ठिकाणी धान्य मिळत नसल्याची ओरड आहे या विरोधात बहुजन युथ पँथर ग्राहकांच्या मदतीला सरसावली असून कर्जत तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या तमनाथ येथिल रेशन दुकानात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत पुरवठा अधिकारी व तहसीलदार यांनी त्याची सखोल चौकशी करून संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची लेखी मागणी बहुजन युथ पँथर चे रायगड जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी केली आहे. कारवाई नाही झाली तर आंदोलन केले जाईल असा इशारा सुशील जाधव यांनी दिला आहे.

कर्जत तमनाथ येथे सरकार मान्य रास्त भाव धान्य दुकानात आहे. अनेक वर्षांपासून या दुकानदाराकडून धाण्याचा काळाबाजार होत असल्याचा आरोप स्थानिक करीत असून त्या बाबतची लेखी तक्रार जिल्हा पुरवठा अधिकार, कर्जत पुरवठा तहसीलदार, तहसीलदार यांच्याकडे बहुजन युथ पँथर चे जिल्हा अध्यक्ष सुशील भाई जाधव यांनी केली असून लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर जण आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.यावेळी त्यांच्यसमवेत कर्जत तालुका अध्यक्ष आनंद जगताप बहुजन युथ पँथर रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रविण रोकडे, नागेश कांबळे,सागर केदारी सुरज गायकवाड, अल्पेश गायकवाड, प्रशांत मोरे, किशोर आदी उपस्थितीत होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या