सगरोळी ग्रामपंचायतला आय.एस.ओ नामांकन प्राप्त 

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
           बिलोली तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सगरोळी ग्रामपंचायतीला दिनांक ०८ सप्टेंबर रोजी आय एस ओ नामांकन मिळाले.
सगरोळी ग्रामपंचायत मध्ये कामाची सुसुत्रता, व्यवस्थापन, नागरिकांना पुरविणाऱ्या सोयी, विविध योजना यशस्वी राबविणे, डॉक्यूमेंटेशन सर्वोत्तम असल्या कारणाने सगरोळी ग्रामपंचायतीला आय एस ओ नामांकन मिळाले.
आज मा. येवले सर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन प्रमाणपत्र दिले. सरपंच मा. गोदावरी मलकाजी उस्केलवार, उपसरपंच मा. विश्वनाथ महाजन, ग्रामविकास अधिकारी मा. धम्मानंद धोत्रे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याकामी माजी सरपंच रुपाली शेळके, सरपंच मा. गोदावरी मलकाजी उस्केलवार, उपसरपंच विश्वनाथ महाजन, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी नामांकनासाठी प्रयत्न केल्याचे ग्रामविकास अधिकारी मा. धम्मानंद धोत्रे यांनी सांगितले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या