“जाफराबाद हल्लाप्रकरणी” दोषींना कडक शिक्षा व्हावी !

लोहा तालुका प्रेस पत्रकार संघाची मागणी,तहसीलदारांना दिले निवेदन!
(विशेष प्रतिनिधी / रियाज पठान)
“जाफराबाद प्रकरणी” पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर अवैद्य रेती माफियांनी कार्यालयात जाऊन जीव घेणा हल्ला केल्याप्रकरणी आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करून न्याय मिळवून देण्यासंदर्भात तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
दैनिक पुढारीचे पत्रकार ज्ञानेश्वर वाबळे यांच्यावर वाळूच्या बातम्या दिल्याबद्दल 18 ते 20 माफियांनी कार्यालयात जाऊन मारहाण करून जखमी केले.सदरिल प्रकरणातील आरोपींना शासनाने कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा लोहा तालुका संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून सदर जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
सदरील निवेदनावर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पवार, जेष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे, संतोष तोंडारे, संजय कहाळेकर, मोहन पवार, तुकाराम दाढेल, मारोती चव्हाण, शिवराज दाढेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ताज्या बातम्या