मुखेड तालुक्यातील श्रीक्षेत्र येवती येथील श्री सद्गुरु नराशाम महाराज मठसंस्थांनच्या वतीने पुढील वर्षी द्वारका येथे भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. द्वारका येथे आयोजित भागवत कथेस नागरिकांनी व भाविकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सद्गुरु नराशाम महाराज मठसंस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे.
[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
मुखेड तालुक्यातील श्री क्षेत्र येवती येथील श्री सदगुरू नराशाम महाराज मठसंस्थांनच्या वतीने श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी येथे दिव्य स्वरूपात भागवत कथा सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे. भागवत कथा सोहळ्यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
श्री प.पु सदगुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती (लघु आळंदी) ता.मुखेड च्या वतीने आयोजित श्री क्षेत्र श्री जगन्नाथपुरी ( चारधाम पैकी एक धाम ) येथे श्री श्रीमद् भागवत कथेचे भव्य दिव्य स्वरूपात सुरुवात संपन्न झाली आहे.
महाराष्ट्रातून व आंध्रातून भाविक कथेचे श्रवण करण्यासाठी श्री जगन्नाथ पुरी येथे मठाधिपती श्री सद्गुरु नराशाम महाराज यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न झाले. भव्य शोभायात्रा काढण्यात आली. रुद्र, लक्ष तुलसी अर्चना, सामूहिक जप, काकडा, हरिपाठ, ग्रंथतुला, शर्करा तुला, विष्णुसहस्रनाम पाठ, अशा भव्य स्वरूपात अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.
कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात दि. 9 एप्रिल 2023 पासून ते दि.15 एप्रिल 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले होते.
अनेक भक्तगण उपस्थिती होते..आमदार श्री राजेश पवार – नायगाव विधानसभा, माजी.आमदार सुभाषराव साबणे, सौ. पूनमताई राजेश पवार, श्री विजय चव्हाण, उपनगराध्यक्ष नगरपरिषद नायगाव, प्रकाश पाटील बेमरेकर, मा.जि. प.सदस्य नांदेड, डॉ. सुधाकर कोटगिरे मुखेड, डॉ.मानसी पवार मुंबई, डॉ. संतोष बोधनकर नांदेड, हेमंत बेंडे नांदेड, भार्गव राजे नांदेड, विशाल चौधरी भोकर इत्यादी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खालील भक्तांचे सहकार्य मिळाले. श्री बाळू महाराज जोशी येवतीकर, राजू पाटील मोकासदरेकर, दत्तात्रय पाटील टाकळीकर, महेश धूमशेठवार नांदेड, नंदकुमार दाचावार बारहळी, पांडुरंग पाटील टाकळीकर, संतोष महेंद्रकर मुखेड, संतोष मेडेवार मुखेड, व्यंकट सावकार पदमावार नांदेड, चंद्रकांत काचमवार टेंभुर्णीकर, अवधूत बेंडे नांदेड, लक्ष्मीकांत कुलकर्णी, थडीबोरगावकर यांनी श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी येथे विशेष पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे.
सिकंदराबाद येथे सर्व भक्तगणासाठी जातानाची जेवणाची व्यवस्था श्री देवदास जळबा पाटील येवतीकर यांच्यावतीने करण्यात आली होती. हैदराबाद येथे येतानाची व्यवस्था श्री महेंद्रकर परिवार मुखेड व डॉ.शिवदास ढगे हैदराबाद यांच्यावतीने करण्यात आली होती.
यात्रेमध्ये सुमारे चारशे भाविक उपस्थित होते. तारदडा गावकऱ्यांनी भव्य अशी गुरुवर्य नराशाम महाराज यांची शोभा मिरवणूक काढली. व येवती येथील भाविकांनी भव्य अशी शोभा मिरवणूक काढून गुरुवर्य यांचे येवती येथे स्वागत केले आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy