जालना येथील सख्या तीन भावांचा मृत्यू झाला त्यांच्या प्रत्येकी कुटुंबाला 25 लक्ष शासकीय मदत करा – अरूणकुमार सुर्यवंशी

लाॅकडाऊन मधील घरगुती वीजबील पुर्णपणे माफ करा-प्रजासेना प्रमुख अरूणकुमार सुर्यवंशी यांची प्रतिक्रिया!●

( विशेष प्रतिनिधी – रियाज पठाण )

(वरिल लिंकवर क्लिक करून सविस्तर व्हिडिओ पुर्ण पहा.)

काही दिवसांपूर्वी एक अत्यंत दुखःद घटना मिडीयाच्या माध्यमातून पहायला मिळाली. ती घटना होती जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे या गावातील जाधव कुटुंबातील तीन सख्या भावांचा शेतात वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

रामेश्वर अप्पासाहेब जाधव, ज्ञानेश्वर अप्पासाहेब जाधव, सुनिल अप्पासाहेब जाधव असे हे तीन बंधु शेतात रात्रीच्या वेळी गहु या पिकाला पाणी देण्याच्या उद्देशाने घरून रात्रीच गेले.पण घरी ते न परतल्याने वडीलांनी शेतात जाऊन शोधाशोध केली त्यावेळी ही घटना उघडकीस आली.

रात्री एका भावाने मोटार चालु करीत असताना त्याला वीजेचा धक्का बसला आणि तो बाजुच्या विहीरीत जाऊन पडला.भावाला काय झालं हे बघण्यासाठी इतर दोघेजण तिथे आले.पण आपला भाऊ तिथ दिसत नसल्याने विहीरीत डोकावुन पाहताच पाण्यात तरंगत असलेला भाऊ दिसला इतर दोघांनी त्याला वाचवण्यासाठी विहीरीत उडी घेतली पण विहिरीच्या पाण्यात करंट उतरलेले असल्याने तिघाही भावांचा मृत्यू झाला अशी चर्चा गावात होत आहे.

वडील शेतात गेल्यानंतर हा प्रकार समजला.हा घातपात आहे का? याचाही तपास पोलिस करीत आहेत.

याविषयी प्रजासेना संघटना प्रमूख अरूणकुमार सुर्यवंशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

ताज्या बातम्या