जामगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी योगेश पाटील सावंत तर व्हाईस चेअरमन पदी गुणाजी बापूराव सावंत !

  • शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती !!
[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
आज शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत जामगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन, व्हॉईस चेअरमन आणि संचालक मंडळाची निवड करण्यात आली.
सदरील सोसायटीही काँग्रेसच्या ताब्यात आहे. विशेष उपस्थिती म्हणून सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पूयड, उपसरपंच विलास पाटील नरवाडे हे होते.

यावेळी चेअरमन पदी योगेश पाटील सावंत तर व्हाईस चेअरमन पदी गुणाजी बापूराव सावंत यांची निवड करण्यात आली. तर संचालक म्हणून व्यंकटराव पाटील सावंत, पुर्भाजी पाटील शिंदे, दयानंद चंदेवाड, बालाजी पाटील सावंत, इराबा पांचाळ, पुंडलिक पाटील सावंत, व्यंकटी कोंडजी सावंत, सिद्धराम झुंझारे, लक्ष्मी बाई सावंत, विट्ठल लक्ष्मण सावंत, चैतन्यबाई केशव सावंत आदी ची निवड आज जामगाव येथे करण्यात आली.

यावेळी प्रशासनातर्फे कुरुडे मॅडम आणि सेक्रेटरी साहेबराव सूर्यवंशी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या