जनसेवक स्व.बाबन खंडू दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ साडीचोळी,ग्रंथ वाटप आणि प्रबोधन कार्यक्रम..!

 

माणसाला प्रेरणेची गरज असते, आणि ती प्रेरणा आपल्या आई वडिलांकडून आपल्याला मिळत असते. जीवन हे धावपळीच आहे या जीवनात माणूस जन्माला येतो आणि निघून जातो. पण त्यांचे कार्य मात्र राहून जाते त्या कार्याचा गौरव विचारांची देवाणघेवाण, आणि त्यांची आठवण ही कायमस्वरूपी राहावी, आणि आपण जे घडलो फक्त आईवडिलांच्या आशीर्वादाने त्यांचे उपकार हे कधीच विसरून चालणार नाही. म्हणून दिनांक 21 फेब्रुवारी 2021 रोजी. जनसेवक स्व. बाबन खंडू दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ साडीचोळी व ग्रंथ वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन युवा साहित्यिक सोनूजी बाबन दरेगावकर यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते..!

महिलांचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून 60 महिलांना साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला आलेल्या सर्वच मान्यवरांचा सत्कार व सन्मान, कॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? हा ग्रंथ भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. शोभाबाई संभाजी पा. शिंदे तर प्रमुखवक्ते डॉ. हनुमंत भोपाळे हे होते. याप्रसंगी डॉ.हनुमंत भोपाळे यांनी सविस्तर आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ते म्हणाले दरेगाव नगरीचे माजी सरपंच म्हणून जनतेची सेवा करताना बाबनजी दरेगावकर यांनी अतिशय प्रेमळ, संयमी दाखवला. सर्वाना आदरपूर्वक बोलणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव युवा साहित्यिक सोनूजी दरेगावकर साडीचोळी व ग्रंथ वाटप आणि व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करून कृतीशील आदरांजली वाहिली आहे. अशा कार्यक्रमातून अनेक प्रेरणा मिळतात. माणसानं असे काम करायला हवे, आपल्या कायमस्वरूपी जाण्याने काही तरी विधायक आठवण राहायला हवी असे यांनी प्रतिपादन साहित्यिक डॉ हनुमंत भोपाळे यांनी केले. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मा. शिवा कांबळे म्हणाले दरेगाव हे गाव जरी छोटं असलं तरी या गावचा इतिहास हा खूप मोठा आहे. आईवडिलांच्या संस्काराने घडणारे मुलं या गावी निर्माण झाली आहेत अशा महान गावचा प्रथमतः आदर केला पाहिजे. स्व. बाबन खंडू दरेगावकर यांच्यावर प्रेम करणारी माणसं या गावात खूपच जिव्हाळ्याची दिसतात. व त्यांच्या कार्याला कोटी कोटी विनम्र अभिवादन व ह्या कार्यक्रमातुन योग्य दिशा नक्कीच मिळेल आणि सोनूजी दरेगावकर असा कर्तबगार गुणी मुलगा प्रत्येक गावात निर्माण व्हावा, असे शिवा कांबळे म्हणाले .कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सरपंच शोभाताई शिंदे म्हणाल्या स्व. बाबन हा आमच्या घरातील कुटुंबातील सदस्या सारखा व्यक्ती होता. आम्हाला त्यांच्या जाण्यानं हे जग सुन्न सुन्न वाटतं. त्यांच्या मुलानं सोनूने असा एवढा मोठा कार्यक्रम घेऊन खरंच स्व. बाबन खंडू दरेगावकर यांचे चांगले कार्य पुढे नेत आहे. सोनूच्या पुढाकाराने स्व. बाबन खंडू दरेगावकर यांच्या पुण्यस्मरणार्थ साडीचोळी व ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम हा महिलांचा सन्मान करणारा अविस्मरणीय कार्यक्रम ठरेल, असे मत सरपंच मा.सौ. शोभाबाई संभाजी पा. शिंदे यांनी व्यक्त केले..!

यावेळी विचारपीठावर,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सौ. शोभाबाई संभाजी पा. शिंदे सरपंच दरेगाव, मा. डॉ. हनुमंत भोपाळे सुप्रसिद्ध साहित्यिक, नांदेड, मा. शिवा कांबळे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, मा. गंगाधर सोनटक्के शिक्षणाधिकारी पंचायत समिती, उमरी, मा. शिवाजी टोम्पे आदर्श शिक्षक महाराष्ट्र राज्य, मा. सुनील जाधव रणजी क्रिकेटपटू महाराष्ट्र राज्य, मा. बाळासाहेब पांडे दैनिक पुण्यनगरी, नायगाव तालुका प्रतिनिधी, मा. मंछिद्र गवाले मानवी हक्क नांदेड जिल्हाध्यक्ष, मा. अहेमद बाबा बागवाले टायगर अटोरिक्षा संघटना, नांदेड जिल्हाध्यक्ष, मा. भीमराव बैलके, मा. मुख्याध्यापक रानशेवार सर, मुख्याध्यापक झुडपे सर, मा. राजेश घोडके, मा. मुरलीधर कांबळे, मा. उत्तम बाबळे, मा. बळीराम कांबळे, मा. ज्ञानोबा गवाले, मा. संजय मुधळे, मा.गंगाधर रेडी, मा. भिमराव पवार, मा. मनोज वाघमारे, मा. राजेश बनसोडे, मा. सतिश इजळकर, मा. दीपक शिरसे, मा. नारायण गायकवाड, मा. अमोल लांडगे यांची उपस्थिती होती..!

तर कार्यक्रम यशस्वीसाठी, मा. मारोती पा. शिंदे, मा. संतराम रामशेटवाड, मा. संभाजी पा. शिंदे, मा. बालाजी पा. शिंदे, मा. देविदास पा. भोपाळे, मा. प्रदीप पा. शिंदे, मा. केशव पा. शिंदे, मा. बापूराव पा. चिंचाळे, मा. मारोती चिंतेवाड, मा. श्रीराम पा. शिंदे, मा. कोंडीबा पा. शिंदे, मा.व्यंकोबा कानगुले, मा. मारोती आमनवाड, मा. सुधाकर चिंतेवाड, मा. पिंटू पा.भोपाळे, मा. बालाजी चिंतेवाड, मा. नरहरी कानगुले, मा. माधव आमनवाड, मा. बाबुराव कानगुले, मा. सतीश शिंदे, मा. दिगंबर घोनशेटवाड, मा. गोविंद वाघमारे, मा. निवृत्ती बैलके, मा. नारायण बैलके, मा. संभाजी घोणशेटवाड, मा. शंकर घोणशेटवाड, मा. व्यंकटी बैलके, मा. तुकाराम घोणशेटवाड, मा. शेषेराव वाघमारे, मा. मोहन बैलके, मा. रामेश्वर घोणशेटवाड, मा. विजय घोणशेटवाड, मा. मधुकर वाघमारे, मा. दिगंबर बैलके,मा. भाऊराव लांडगे, मा. दत्ता बैलके, मा. उत्तम बैलके, मा. बालाजी बैलके, मा. साईनाथ बैलके, मा. संतोष बैलके, मा. केशव घोणशेटवाड, मा. माधव वाघमारे, मारोती घोणशेटवाड, सचिन बैलके, पिंटू घोणशेटवाड, सतिश बैलके, किशन बैलके, शुभम बैलके, श्याम बैलके, विकास बैलके, यांनी परिश्रम घेतले. आणि समस्त गावकरी मंडळींची या कार्यक्रमास उपस्थिती होती..!

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार युवा साहित्यिक सोनूजी बाबन दरेगावकर यांनी मांडले..!

ताज्या बातम्या