लोह्यात कोरोना ची साखळी तोडण्यासाठी दिनांक 19 मार्च ते 23 मार्च पाच दिवस जनता कर्फ्यु !

नागरिकांनी सहकार्य करण्याचे नगराध्यक्ष श्री गजानन सूर्यवंशी यांचे आवाहन !

(विशेष प्रतिनिधी-रियाज पठान)
                 लोहा शहर व तालुक्यातील कोरोनाची ची साखळी तोडण्यासाठी लोहयात दिनांक १९ मार्च ते २३ मार्च पर्यंत जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी घेतला असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले आहे.

गेल्या वर्षी चीन मधून आलेल्या कोरोना या संसर्गजन्य महामारी रोगाने आपल्या भारत देशा सहित संपूर्ण जगात हाहाकार माजविला त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले याचा प्रादुर्भाव आपल्याला लोहा तालुक्यात नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीपासून झाला. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले गेल्या काही महिन्यांपासून हा कोरोना कमी झाला होता शासनाने लाॅकडॉऊन तोडून आपडाऊन सुरू केले.
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी होत होते परंतु आता गेल्या फेब्रुवारी ते आता चालू मार्च महिन्यामध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे व कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असल्यामुळे याची चिंता लोहा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी व शहरवासीयांना लागली होती.
त्यामुळे त्यांनी आज दिनांक १७ मार्च रोजी लोहा नगर परिषदेच्या सभागृहांमध्ये लोहा शहरातील व्यापारी नागरिक यांची बैठक बोलावून कोरोना वर उपाययोजना करण्यासाठी व टाळण्यासाठी व कोरोनाला हरवण्यासाठी खुल्या चर्चेचे व उपाययोजनेचे आव्हान केले होते.
यावेळी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, गटनेते करीम शेख, नगरसेवक भास्करराव पाटील पवार, अमोल व्यवहारे, संभाजी पाटील चव्हाण, केतन खिल्लारे, नारायण येलरवाड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार,पालीमकर, येवले, वडजे, कुरेशी, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक , पत्रकार यांच्या सहीत नगर पालीकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शहरातील व्यापारी, नागरिक, पत्रकार,आदीने आपले म्हणणे मांडले .
यानंतर प्रमुख मार्गदर्शन करताना लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले की, आज बोलाविलेल्या लोहा नगरपालिकेच्या बैठकीला सर्वजण उपस्थित राहिले याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आज सर्वानुमते लोकांच्या कल्याणासाठी लोकांनी लोकांसाठी पाळले जाणारे जनता कर्फ्यु ठरविण्याचे व जनता कर्फ्यू काटेकोर पालन करण्याचे मी लोहा शहर वासियांना आवाहन करतो. लोहा शहरातील व तालुक्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिनांक १९ मार्च ते २३ मार्च दरम्यान लोहा शहरात जनता कर्फ्यु लावण्यात येणार आहे.
यानंतर लोहा शहरातील सर्व किराणा दुकान,कापड दुकान, सिमेंट दुकान, जनरल. स्टोअर्स, हॉटेल्स, भाजी पाला,फळ विक्री सह आठवडी बाजार शाळा-कॉलेज खाजगी कोचिंग क्लासेस आदी सर्वच बाजार पेठ बंद राहणार आहे जे जे लोक व्यापारी यांचे उल्लंघन करणार आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल असे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले.
तसेच पुढे बोलताना नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी म्हणाले की, गेल्या वर्षी लोहा शहरात व तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढला होता तेव्हा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आपण लोहा नगरपालिकेच्या वतीने जनता कर्फ्यू लावला होता त्यावेळी लोहा शहरातील जनतेने व्यापाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता व कोरोनाची साखळी तोडण्यात आपण यशस्वी झालो होतो त्याचप्रमाणे आताही कोरोना ची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी व व्यापाऱ्याने सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले आहे.

ताज्या बातम्या