उमरीत जनता कर्फ्यु बाबत तहसीलदार माधव बोथिकर यांच्या अध्यक्षतेत बैठक संपन्न

( नांदेड जिल्हा प्रतिनिधी- आनंद सुर्यवंशी )

आज जनता कर्फ्यू “बाबत बैठक संपन्न झाली.यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणुन तहसीलदार माधव बोथीकर होते.

यावेळी त्यांनी जनता कर्फ्यू दरम्यान – माझ्या प्रशासनाला व्यापारी वर्गावर जबरदस्तीचे बंदचे निर्बध लादता येत नाहीत.त्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी आपापल्या असोशिएसनची चर्चा करून, एकमत घडवून शहर सुरक्षा दृष्टीक्षेपातुन आपल्या असोसिएशनच्या लेटरहेड वर आम्ही स्वखुशीने या जनता कर्फ्यूत सहभागी होत आहोत असे नमूद करून, एक प्रत तहसीलदार व एक प्रत मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दयावे.बंदवर सहमत झाल्यात जमा आहे.सदरील बंद दि.09/09/20 ते दि.13/09/20 पर्यत बंद सर्व व्यापारपेठा,किराणा,कृषी व्यावसायिक,आडत,भाजीपाला, हॉटेल, मद्य दुकाने, किरकोळ व्यावसायिक, हातगाडे बंद रहाहिल.बंदचे उल्लंघन केल्यास आर्थिक दंडापाठोपाठ पोलीस कारवाईस समोर जावे लागेल.त्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्याला पाच दिवस दरम्यान अत्यंतआवश्यक किराणा, भाजीपाला, दळण हे आज व उदया सायंकाळ पर्यत खरेदी करून घेणे.असे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या