नायगाव येथे जश्ने ईद मिलादुन्नबी थाटात साजरी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
जशने ईद मिलाद उन नबी हजरत मोहम्मद पैगम्बर साहेब यांच्या जयंती निमित्त नायगाव येथे मुस्लिम बांधवांनी मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने थाटात साजरी केली.
मुस्लिम बांधवांचे धर्मगुरू मोहम्मद हजरत पैगंबर यांच्या जयंती जश्ने ईद मिलादुन्नबी दिन निमित्ताने शहरातून जश्ने ईद मिलादुनबी कमिटीच्या वतीने भव्य दिव्य रॅली, नूर चौक ते हेडगेवार चौक, शिवाजी चौक, पासून नगरपंचायत ते तवकलशाह वली दर्गा पर्यंत काढण्यात आली होती. विविध देखावे सादर केले.

धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जश्ने ईद मिलादुन्नबि निमित्त रॅलीमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. जश्ने ईद मिलादुन्नबी कमिटीचे नेतृत्व नायगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य सय्यद रहीम सय्यद मीर, अब्दुल करीम अब्दुल गंनी चाऊस, दस्तगीर भाई, मोहम्मद इस्लाम मिजभाई, मोहम्मद गौस पठाण, मेहबूब मोहम्मद मेहबूब आलम, सय्यद अली मुल्ला सय्यद शफी, जुनेद पठाण, मुन्ना पठाण, सय्यद रब्बानी,यांच्या शेकडो मुस्लिम बांधव प्रयत्नातून यशस्वी ठरली रॅलीमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून नायगाव पोलीस ठाणे च्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या