झुंड – जगण्यासाठी संघर्ष करावा लागतोच ! – शब्दांकन: सोनू दरेगावकर, नांदेड

( चित्रपट समीक्षा ) झुंड चित्रपट पाहण्यासाठी जवळच्या टॉकीज जवळ गेलो आणि चित्रपटाची सुरुवात झाली. झोपडपट्टी नावाचं एक ठिकाण तिथं गोरगरीब जनतेचं राहण्याचं होत ते मुकाम, चित्रपटाचे नाव झुंड नेमकं झुंड काय असेल असं अनेकांना वाटतं असेल. तर मग आता सविस्तर वाचा..!
झोपडपट्टी या भागामध्ये गरीब कष्टकरी, लोक राहतात यामध्ये काही मुलांना तिथलं वातावरनाणे खूप बिघडून टाकलेले असते. चार पाच टुकार पोरांची गँग होती. लहानपणापासून त्यांना लागलेलं खूप भयानक व्यसन गांजा, सिगरेट, आणि चोरी करणं हे खूप समाजघातक होते. रस्त्यावर एक महिला जात होती. तिच्या गळ्यातील ताईत झोपडपट्टीतील डॉन गँग यांनी ते ताईत पळवून नेले..!
त्या महिलेच्या गळ्यातील ताईत विकून जेवढं पैसे आले तेवढे पैसे सर्वजण नशा करून उडवत होते. तेवढ्यात, विजय बारसे (अमिताभ बच्चन) यांची इंट्री झाली. त्यांना हे व्यसनाधीन दृश्य पाहायला मिळाले. अभिताभ बच्चन हे विचारत पडले. विचारत पडून ते नाही थांबले तर डॉन गँग सोबत मैत्रीच नातं संपादन केले..!
पुढे या डॉन गँग मध्ये कसा बदल करता येईल, आणि यांना या व्यसनाधीन झालेल्या अवस्थेतुन कस बाहेर काढता येईल त्यांनी एक मनात खूप चांगली संकल्पना जोपासली. कोणतंही व्यसन हे कधीच लवकर सुटत नाही परंतु ते व्यसन संपवण्यासाठी त्या साठी थोडा फार आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागतो..!
थोड्या वेळाने पाऊस सुरू झाला. या पावसात एक डब्बा मुलांना दिसला आणि त्यांनी त्याच्यासोबत पावसात भिजत भिजत खेळू लागले. तेंव्हा विजय बारसे (अमिताभ बच्चन) यांच्या नजरेसमोर हे मुलं डब्ब्यासोबत खेळताना पाहून, डॉन गँगच्या समोर फुटबॉल टाकून त्यांना फुटबॉल खेळण्यासाठी जवळच्या खिशातून 500 रुपये देऊन त्यांना फुटबॉल खेळण्याची आवड निर्माण व्हावी. म्हणून डिमांड केली. आणि पहिल्या दिवशी 500 रुपये त्यांना दिले. पुढे विजय बारसे (अमिताभ बच्चन) छोट्या मोठ्या माणसालाही शिक्षणाचे महत्व पटवून सांगत होते..!
एका दिवशी डॉन गँग आणि दुसऱ्या मुलांचे भांडण झाले. पोलिसांनी दोघांना पण अटक केली आणि शिक्षा देऊन पुन्हा सुटका पण केली. फुटबॉल घेऊन पुन्हा विजय बारसे (अमिताभ बच्चन) यांनी झोपडपट्टी मध्ये गेले आणि दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी त्यांना 500 रुपये दिले. व फुटबॉल खेळण्यासाठी सांगितले..!
मुलं आता फुटबॉल मध्ये जास्तच रंगून गेले आणि त्यांना जे गांजा, दारू, सिगारेट त्यांचे व्यसनं कमी होऊ लागले. पुन्हा एका दिवशी विजय बारसे (अमिताभ बच्चन) हे झोपडपट्टी मध्ये गेले नाहीत, त्या मुलाला वाटू लागले आपण फुटबॉल खेळावे पण तो सर आले नाहीत मग त्यांनी विजय बारसे (अमिताभ बच्चन) यांच्या घरी जाऊन दरवाजा खट खट वाजऊ लागले. त्यांनी घरच्या बाहेर आले मुलं त्यांना विचारू लागले आम्हाला खोटं का बोललात रोज आम्हाला फुटबॉल खेळण्यासाठी पैसे देतो म्हणून तुम्ही आज आलं नाही..!
तेंव्हा विजय बारसे (अमिताभ बच्चन) झोपडपट्टीतील डॉन गँगला म्हणाले माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. पुन्हा येतो मग मुलं काही जणांनी राग केला तर काही जणांनी फुटबॉल द्या म्हणून विनंती केली. तेंव्हा त्यांनी फुटबॉल घेऊन गेले आणि झोपडपट्टी मध्ये जाऊन फुटबॉल खेळू लागले. मुलं आता व्यसनापासून दूर जात आहेत असं विजय बारसे (अमिताभ बच्चन) यांना वाटू लागले. पुन्हा त्यांनी त्यांच्या शाळेसोबतच्या टीम सोबत फुटबॉल खेळण्यासाठी परवानगी घेतली..!
पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी डॉन गँगच्या सर्व टीम हिटलर भाई यांच्याकडे गेले हिटलर भाई म्हणजे झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक आदरणीय नागराज मंजुळे यांना वर्गणी मागण्यांसाठी त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडून वर्गणी घेऊन जाताना नागराज मंजुळे यांना सर्वांनी, जय भीमचा नारा देऊन क्रांतिकारक सलाम केले. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली..!
पुन्हा झोपडपट्टी टीम आणि शाळेतील टीम फुटबॉल खेळण्यासाठी सामना रंगला आणि झोपडपट्टी या टीमने फुटबॉल मध्ये विजय मिळवला. पुढे टीम जिंकल्यावर विजय बारसे (अमिताभ बच्चन) आणि मीडियानी झुंड टीमची सर्वांची मुलाखत घेतात. जन्माने कोणी अपराधी होत नाही. त्यांना त्यांच्या वातावरणाने बनवलं जात. असं स्पष्टीकरण सर्वजन देऊ लागले..!
पुन्हा फुटबॉल खेळण्यासाठी सर्वजण येतात कधी भांडण तर कधी हसणं त्यांनी खेळताना पाहायला मिळतं. झोपडपट्टी झुंड नावाच्या टीमचे आंतरराष्ट्रीय टीम सोबत खेळण्यासाठी सर्वांचे सलेक्शन होतो..!
आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी त्यांना पासपोर्ट काढावे लागतो. विजय बारसे (अमिताभ बच्चन) यांनी त्यांची जमीन गिरवी ठेऊन पैसा काढतात. आणि सर्व टीमला सांगतात सर्वजण पासपोर्ट काढण्यासाठी कागदपत्रे जमा करा सर्वजण कागदपत्रे तयार करण्यासाठी धावपळ करताना दिसतात हे कागदपत्रे काढताना कोणाला अडचणी येतात तर कोणाला येत नाहीत..!
आदिवासी समाजातील मुलींचे रहिवासी प्रमाणपत्र काढण्यासाठी तिची खूप धावपळ होताना पाहायला मिळते. तिला खूप फिरावं लागलं रहिवासी काढण्यासाठी तिला ओळखपत्र सुध्दा कोणी देत न्हवत शेवटी त्या गोष्टीचा पाठलाग केल्यामुळे तिला रहिवासी प्रमाणपत्र मिळालं आणि तिचे पण सर्व कागदपत्रे तयार झाले. सर्वांचे कागदपत्रे तयार झाले फक्त एकाचे राहिले तो म्हणजे अंकुश डॉन गँगचा प्रमुख त्याच्यावर अगोदर गुन्हे दाखल झालेले होते..!
पोलीस कॅरेक्टर प्रमाणपत्र त्याचे राहिले होते. पण त्याला ते मिळत नव्हते कारण त्यांनी गुन्हा केला होता. पुढे कोर्टात ही केस गेली तरी पण त्याला तिथं त्यादिवशी न्याय मिळाला नाही. आता पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी सर्वजण तयार झाले फक्त या मध्ये वंचित राहिला अंकुश आणि नाईलाजाने अंकुशला त्या दिवशी सर्वांसोबत जाता आलं नाही..!
सर्व झुंड टीम रवाना झाली. थोड्या दिवसाने कोर्टाचा आदेश निर्दोष आल्यामुळे अंकुशला पोस्टाने त्याचा पासपोर्ट आला अंकुश खूप आनंददायी स्वतःला बनला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळण्यासाठी तो पण त्या मार्गावर जाऊ लागला. जाता जाता अगोदर ज्यांच्या सोबत वाद झाला त्यांनी अंकुशला रस्त्यावर अडवण्यात आले. आणि मारहाण करू लागले तेवढ्यात भावना मॅडमनी हा प्रसंग पाहिला आणि पोलिसांना तात्काळ फोन करून त्या गुंड्यापासून त्याला वाचवण्यात आले..!
आणि भावना मॅडमने त्याला विमानतळावर घेऊन गेले. तिथं झुंड टीमची तपासणी होऊ लागली. सर्वजण पुढे पुढे जात होते. शेवटचा अंकुश राहिला त्याची पण तपासणी चालू झाली. अंकुशच्या तपासणीला वेळ लागत होता त्याचे कारण जरी त्याला फुटबॉल खेळण्याचे व्यसनं लागलं असलं तरी, त्याच्या जवळील भांडण करणारे हत्यार त्याच्या पासून दूर गेले न्हवते त्याच्या पायाच्या बाजूला एक कटर होते. ते त्याला शेवटी काढून फिकून द्यावे लागले. आणि सर्व झोपडपट्टी मधील झुंड टीम ही आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉल स्पर्धा खेळण्यासाठी निघाली..!
चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. दिग्दर्शकाला जे आणि जसं म्हणायचं आहे, ते तो चित्रपटात मांडतो, मग समोर कितीही मोठा कलाकार असो. नागराज मंजुळे या संवेदनशील दिग्दर्शकाच्या ‘झुंड’बाबत तेच म्हणता येईल. मेहनत, अभ्यास, चिकाटी, जिद्द या सगळ्याच्या जोरावर त्यानं हा चित्रपट घडवला आहे. आजवरच्या प्रत्येक कलाकृतीत तो काही सांगू पाहतोय; पण हे सांगणं शब्दबंबाळ नाही. हेच त्याच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे..!
‘झुंड’मध्येही त्यानं महत्त्वाचा विषय, प्रश्न उपस्थित केला आहे, जो विचार करायला भाग पाडतो. खेळ प्रशिक्षक असलेल्या विजय बारसे यांच्या आयुष्यावर बेतलेली गोष्ट ‘झुंड’मध्ये दाखवली आहे. नागपूरस्थित समाजसेवक विजय बारसे यांनी तिथल्या झोपडवासीय मुलांचं फुटबॉल या खेळातलं कौशल्य ओळखून त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं..!
त्यानंतर त्यांनी स्लम सॉकर या संस्थेची स्थापना केली. हा प्रवास चित्रपटात आहे. चोरी-हाणामारी किंवा नशा करणं अशी या मुलांच्या दिवसाची सुरुवात होते. एक दिवस विजय बारसे (अमिताभ बच्चन) त्यांना एका मोठ्या प्लास्टिक डब्याबरोबर फुटबॉल खेळताना पाहून त्यांची कौशल्यं टिपतात. त्यांना फुटबॉलचं प्रशिक्षण देऊन त्यांची टीम बनवायचं ठरवतात. यातले अडथळे, संघर्ष आणि प्रश्न हा सगळा प्रवास म्हणजे ‘झुंड’

★★★ – शब्दांकन – ★★★
युवा साहित्यिक- सोनू दरेगावकर, नांदेड..!

दिग्दर्शक : नागराज मंजुळे यांनी आजच्या नवीन पिढीला योग्य दिशा आणि प्रेरणादायी आशा देण्याचं काम, झुंड चित्रपटात दाखवलं त्याबद्दल आदरणीय नागराज मंजुळे सरांचे मनापासून खूप खूप अभिनंदन..!
*संपर्क: मोबाईल – ७५०७१६१५३७*

ताज्या बातम्या