कुंटूर परिसराच्या वतीने राजमाता जिजाऊ यांचा जयंती उत्सव साजरा !

[ कुंटुर प्रतिनिधी – बालाजी हनमंते ]
नायगाव तालुक्यातील कुंटूर ग्रामस्थांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भव्य प्रांगणात माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे गावकऱ्यांच्या हस्ते पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

 स्वराज्याच्या मार्गदर्शक राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहामध्ये साजरी करण्यात आला. यावेळी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाचव्या वर्गातील कुं सोनाली गंगाधर इळतगावे ह्या विद्यार्थीनीने राजमाता जिजाऊ यांच्या जिवनावर बोलुन सर्वाना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी रुपेशभैया कुंटूरकर, सरपंच प्रतिनिधी मारोतराव कदम, उप सरपंच शिवाजी पा होळकर, सुर्यकांत पा कादम, लक्ष्मण पा आडकीने, परमेश्वर पाटील कदम, निळकंट आडकीने, जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर चे मुख्याध्यापक मा संजय सिंग राजपुत सर, बालाजी हनमंते, यांची उपस्थिती होती.

परीसरातील सालेगाव, सातेगाव, हुस्सा, बळेगाव, ईकळीमाळ, सांगवि, अनेक गावातून लोक उपस्थित होते. संदीप पाटील जाधव सातेगाव, सुरज शिंदे, परमेश्वर पाटील जाधव, विकास कल्याण, हनुमंत जाधव, बबलू पुयड बालाजी पाटील जाधव, गोविंद पाटील हंबर्डे, महेश पाटील रुईकर, योगेश पाटील शिंदे, गोविंद पाटील सांगवीकर, आकाश पाटील कल्याण, वैभव नरवाडे, राहुल लव्हाळे, रामराव पाटील हंबर्डे, गोपीनाथ जाधव, कुंटूर येथील या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक रावसाहेब कदम, गौरव भोसले, अशोक कदम होते. या कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गिता ने केले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या