शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली, यावेळी नायगाव नगरपंचायतीचे भा.नगरसेविका सौ.मिनाताई पाटील कल्याण, सौ. रेणुकाताई पाटील, यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे मोठ्या भक्तीभावाने पूजन करून प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी वंदन करण्यात आले, यावेळी डॉ. गजानन पाटील गडगेकर , सरपंच विश्वनाथ पाटील जाधव, गणेश पाटील चव्हाण, जय भीम मित्र मंडळाचे अध्यक्ष गौतम वाघमारे, प्रजासत्ताक पार्टी तालुका प्रमुख अविनाश गायकवाड, विश्वनाथ खराडे पाटील केदार पाटील कुरे ताकबिडकर यांसह सुभाष पांचाळ, संदिप पांचाळ, बंटी घंटेवाड, आळंदीकर पांचाळ, प्रदिप जोंधळे लालवंडीकर, गजानन वाघमारे वंझरवाडीकर, गंगाधर बडूरकर, राजपाल सोनटक्के, दिपक भोकरे, संग्राम बेलकर, यांच्यासह आदीं कार्यकर्ते बांधवांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
यावेळी शिवानंद पांचाळ म्हणाले दि.१२ जानेवारी १५९८ म्हणजेच स्वराज्यजननी जिजाऊंचा जयंती दिन राजमाता जिजाऊ शिवबांना छत्रपती पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या एक धैर्यवान माता अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीवर मात करत मुघल सत्तेला भारतातून उलथून लावण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या महान माता म्हणजे आऊसाहेब जिजाऊ आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी छत्रपती शिवरायांना राजकारणाबरोबरच नीती,चातुर्य, व्यवहार, संघटन, मुत्सद्देगिरी, अशा अनेक गुणांचे बाळकडू जिजाऊंनी दिले, आणि म्हणूनच शिवरांयासारखे महाप्रतापी तसेच शंभुराजांसारखे रणझुंजार दोन छत्रपती घडू शकले, स्त्री देखील हिंमतवान बुद्धिमान कर्तुत्ववान पराक्रमी दूरदृष्टीची असते हे जिजाऊंनी दाखवून दिले, स्वराज्यजननी जिजाऊंच्या कार्याला आणि त्यांच्या त्यागांना त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी वंदन करून वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या सर्वांना राजमाता आऊसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शिवानंद पांचाळ यांनी पांचाळ परीवाराकडून व मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा यावेळी दिल्या आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy