जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नायगाव हेडगेवार चौकात भाजपाच्या वतीने तीव्र निदर्शने  !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं गेलं. या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून. नायगाव येथील हेडगेवार चौकात भाजपकडून आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. 
    जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनावधानाने हा प्रकार घडल्याचे सांगितल्या जात असले तरी या प्रकरणी भाजप आक्रमक भुमिका घेत असून. शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दत्ता ढगे, जेष्ठ नेते देविदास बोमनाळे, गंगाधर कल्याण, बाबासाहेब हंबर्डे, शिवाजी पाटील पळसगावकर,प्रकाश पा. हेंडगे, डॉ. शिवाजी कागडे, महिला शहराध्यक्ष पल्लवी वडजे, राहूल शिंदे, गजानन भाऊराव चव्हाण, राजू सोनकांबळे, बळीराम वडजे, जुनैद पठाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या