जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न।

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे)
देगलुर-बिलोली विधानसभा पोट निवडणूकीच्या दरम्यान महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेश अंतापुरकर यांच्या प्रचारार्थ नगर सेवक शेख मुख्तार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आज दुपारी १ वाजता संपन्न झाली.
सदरील बैठकीस मुंबईचे पालकमंत्री तथा आमदार ना.शेख अस्लम यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली असून या बैठकीत ना.शेख अस्लम यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन, संघटित राहुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेश अंतापुरकर यांना प्रचंड मतांनी विजयी करून देणे गरजेचे असल्याचे मत आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.
याप्रसंगी माजी महापौर अब्दुल सत्तार, नांदेड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष शेख मसूद सेठ, कवळे गुरुजीे, शिवाजी पाटील पाचपिपळीकर, माजी नगराध्यक्ष डॉ एस.एस. शेंगुलवार, नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेश जिटटावार, उपाध्यक्ष शैलेश -याकावार, सुनिल बेजगमवार, राजेश पोतनकर, नरेश सब्बनवार यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या