देगलूर बिलोली मतदारसंघातून भाजपचे जितेश भाऊ अंतापुरकर यांचा ४८ हजार मतांनी विजय !

देगलूर बिलोली मतदारसंघातील लाडक्या बहिणींने मतांच्या माध्यमातून आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांना आशीर्वाद दिले.

(बिलोली प्रतिनिधी – सुनिल जेठे)
देगलूर व बिलोली विधानसभेचे महायुतीचे भाजपाचे अधिकृत उमेदवार जितेश भाऊ रावसाहेब अंतापुरकर यांचा तब्बल 48 हजारांनी मताधिक्यांनी विजयी झाल्याबद्दल बिलोली शहरात फटाक्यांची आतिषबाजी फुल व गुलाल उधळून भव्य स्वागत करण्यात आले.

 बिलोली शहरातील बागेतील हनुमान मंदिर पासून ते आंबेडकर स्मारक पर्यंत निवडणूक रॅली काढण्यात आली असता बिलोली शहरातील शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बिलोली शहरातील माजी नगराध्यक्ष विजय कुंचनवार, यादवराव जी तुडमे, श्रुती ताई तुडमे, यांनी आमदार जितेश अंतापुरकर यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृषी उ.बा.स.संचालक बाबू कुडके, बिलोली तालुका महिला अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष रेश्मा बेगम शेख अहमद, साजिदा बेगम शेख अहमद, बिलोली शहर अडत व्यापारी साईनाथ अरगुलवार, विश्व हिंदू परिषद चे बजरंग दलचे स्वयंसेवक गजानन पांचाळ, ऋषिकेश गोगरोड, दिलीप उत्तरवार, देवांना तोंदरोड , सलमान शेख, आयुब शेख, लिंगुराम ठक्करोड, पवन गिरी, बिलोली शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या