नांदेड येथे आर्य वैश्य महासभेच्या वतीने नोकरी मार्गदर्शन मेळावा !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड येथे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने आर्य वैश्य समाजातील गरजू होतकरू बेरोजगार तरुण तरुणींना नोकरीसाठी नामवंत कंपन्यांच्या उपस्थितीत रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्र राज्य आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांच्या प्रयत्नातून राज्य भरातील आर्य वैश्य समाज बांधवांना कळविण्यात येते की, आपल्या समाजातील बेरोजगार मुलांना/मुलींना रोजगार मिळण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेने आयोजित केली आहे, तरी समाजातील तरुणांसाठी नोकरी मार्गदर्शन मेळावा नांदेड येथे दि 29 ऑगस्ट 22 सोमवार रोजी वासवी भवन सिडको नांदेड येथे आयोजित केला आहे.
तरी समाजातील ईच्छुकांनी यात सहभाग घ्यावा.
या मेळाव्यात विवीध बारा कंपनी चे प़तीनिधी मुलाखत घेणार आहेत त्या त्या पात्रते नुसार प्रत्येकाला नोकरीची सुवर्ण संधी मिळणार आहे. तरी या संधीचा फायदा समाजातील बेरोजगार तरुणांनी घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे. 
मुलाखतीला जाताना आपले सर्व सर्टिफिकेट आधार कार्ड सोबत घ्यावे. रोजगार शिबिरात आलेल्या बेरोजगार यांना भोजन व्यवस्था महासभेने केलेली आहे. असे नांदेड जिल्हा आर्य वैश्य महासभेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या