केंद्र सरकारला सुबुद्धि द्यावी असा घरोघर जोगवा मागुन नायगाव युवक काँग्रेसच्या वतीने देवीकडे साकडे!
“मनाचे दार उघडा मोदी साहेब आता दार उघडा.” असे म्हणत, देशात कोरोना चा महासंकट त्यात निसर्गाचा लहरीपणा, ओला दुष्काळ, लॉकडाऊन आदि कारणामुळे संबंध माणवाचे जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
नवरात्र महोत्सवाच्या पावन पर्वामध्ये दुर्गामाता आई अंबाबाई यांच्यापुढे युवक काँग्रेसच्या वतीने जोगवा मागत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा,बेरोजगारी दूर करण्याचा, उद्योगधंदे वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचा,माता बहिणीच्या संरक्षणाचा जोगवा, विद्यमान केंद्र सरकारला सद्बुद्धी देण्याचा जोगवा माता अंबाबाईकडे युवक कॉंग्रेस तर्फे आज घरोघर जाऊन मागण्यात आला आहे.
माणिक माधवराव पाटील चव्हाण यांच्या पुढाकारातून यावेळी उपस्थित
विठ्ठल बेळगे, सुरज पाटील शिंदे, तालुकाध्यक्ष एनएसयुआय नवनाथ पाटील जाधव, राजू कांबळे, श्रीहरी पाटील सोमठाणकर, जयराज पाटील पांढरे, सुनील शेळगाव, शिवाजी पाटील चव्हाण,अभिजीत मंगरुळे, राहुल शेळके, यशवंत मांजरमकर व नायगाव युवक काँग्रेस व मा आमदार वसंतराव चव्हाण साहेब मित्र मंडळ उपस्थित होते.